ओठांना लिपस्टीक, अशा अवस्थेत विमानतळ कर्मचाऱ्याने स्वत:ला का संपविले?

ओठांना लिपस्टीक, सलवार आणि नाईटी अशा अवस्थेत विमानतळ कर्मचाऱ्याने स्वत:ला का संपविले?, पोलिसांना पडले कोडे !

विमानतळावर कामाला असलेल्या एका व्यक्तीने स्वत:चे जीवन संपविले आहे. बंद खोलीत त्याचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. विशेष या व्यक्तीने मरण्यापूर्वी महिलांचा साजशृंगार केला होता. त्याच्या घरात कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही की अन्य काही पुरावे. या इसमाने फाशी घेण्यापूर्वी महिलांचा सलवार घातला होता. भांगेत सिंधूर भरला होता, लिपस्टीक लावली होती. मृतदेहाला अशा अवस्थेत लटकलेला पाहून पोलिस देखील हैराण झाले आहेत. उत्तराखंडातील पंतनगरात एअरपोर्टवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून स्वत:ला संपविले आहे. त्यांचे प्रेत महिलांचा साजशृगांर केलेल्या अवस्थेत सापडले. श्रृंगार किट आणि महिलांचे कपडे त्याच्याकडे सापडले. हे सर्व याच कर्मचाऱ्याने आणले की कोणी मागविले होते. की या घटनेला कोणी अन्य जबाबदार आहे? असे पोलीसांनाच कोडे पडले आहे. पोलिसांनी सेक्युअल डिसऑर्डर, ब्लॅकमेल आणि ऑनलाईन एक्टीविटी सारख्या अनेक अॅंगलना लक्षात घेऊन या प्रकरणाची आता चौकशी सुरु केली आहे.

हा कुठल्या मानसिक आजाराचा परिणाम तर नाही ना ? का आणखी काही कारण या प्रकारामागे आहे ? याचा तपास केला जात आहे. ही रविवारी मध्यरात्री घडली आहे. पंतनगर एअरपोर्ट वर कार्यरत असिस्टेंट मॅनेजर आशीष चौंसाली यांचे वागणे रविवारी देखील सर्वसामान्य दिवसासारखाच होता. रात्री उशीरा त्यांच्या घरी पार्टी झाली. नंतर रात्री 10 नंतर त्यांचा भाचा आणि मयत आशीष यांचा दोन दिवसांपूर्वी आलेला मित्र आणि ते आपआपल्या रुममध्ये झोपायला गेले. सोमवारी काका दार वाजवूनही बराच वेळ दरवाजा खोलत नव्हते म्हणून त्यांचा भाचा आकाशला आश्चर्य वाटले. त्याने अखेर शेजारच्यांचा मदतीन दरवाजा तोडून पाहीले तर सर्वांना धक्का बसला. आशीष यांचा देह फॅनला ओढणीने लटकत असलेला दिसला त्यांना स्री अवतारात पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.

सर्व अॅंगलने तपास पोलिसांनी आशीष यांचा मृतदेह पोस्टमार्टेम साठी पाठविला आहे. नंतर आकाश आणि आशीष यांचा मित्र भरत तसेच शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा आशीष यांनी महिलांची सलवार, त्यावर ब्लाऊज आणि वर नाईटी परिधान केली होती. ओठांना लिपस्टीक, कपाळावर टिकली, लांब केसांचा विग परिधान केलेल्या अवस्थेत त्यांना पाहून पोलिसांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. कोणतीही सुसाईड नोट मागे न ठेवल्याने पोलिस आता सर्व अॅंगलने तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *