सोनू सूदच्या मदतीमुळे कोपरगावच्या गायत्रीला पुन्हा मिळाली दृष्टी. अडीच वर्षांची असताना चुना गेल्यानं डोळा निकामी झाला.

पडद्यावर खलनायक आणि खऱ्या आयुष्यात नायक अशी अनोखी ओळख सोनू सूदला मिळाली आहे. करोनाच्या काळात त्याने ज्या प्रकारे बेरोजगार आणि असहाय लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला त्यासाठी त्याचे आजही कौतुक होते. करोना काळात अडचणीक सापडलेल्या हजारो लोकांसाठी ‘मसीहा’ ठरलेला अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करोना काळात मदत केल्यानंतर त्यानं मदत करणं सोडलं नाही. सोनू सूदच्या उदार व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. हा अनुभव कोपरगावकरांनी अनुभवला. कोपरगाव शहरातील रहिवासी गायत्री थोरात नामक मुलीला सोनू सूदच्या मदतीमुळे पुन्हा दृष्टी मिळाली आहे. त्यामुळे गायत्रीच्या जीवनातील अंधकार दूर होऊन तिच्या जीवनात नविन प्रकाश पडला आहे. त्यामुळे गायत्रीने अभिनेता सोनू सूद याचे मनापासून आभार मानले आहे.

ही आहे १४ वर्षीय गायत्री दशरथ थोरात. गायत्री अडीच वर्षांची असताना तिच्या डोळ्यात चुना गेल्यामुळे डावा डोळा पूर्ण निकामी झाला. उजव्या डोळ्याने पुसटसं दिसायचं.जन्मभर असंच राहावं लागणार, याची खंत होती, पण कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांच्या पुढाकाराने आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मदतीमुळे महागडी शस्त्रक्रिया करून गायत्रीची गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली आहे. गायत्रीला दृष्टी मिळाल्यानंतर सोनू सूद यांच्या आभारासाठी छोटे खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अभिनेता सोनू सूद यांनी गायत्रीसोबत व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधला.

गायत्रीला दृष्टी मिळावी यासाठी तिचे वडील दशरथ आणि भाऊ कार्तिक थोरात यांनी खूप प्रयत्न केले मात्र शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च असल्याने गायत्रीचे उपचार थांबले होते. त्यानंतर त्यांनी कोपरगावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांना सांगून त्यांचे जवळचे मित्र असलेले अभिनेते सोनू सूद यांच्याकडे मदतीसाठी प्रयत्न केले. विनोद राक्षे यांनी गायत्री सोबत सोनू सूद यांचे बोलणे करून दिले आणि त्यांनी लगेचच मदतीसाठी होकार दिला. त्यानंतर गायत्रीला पुणे येथील व्हिजन केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.तिथे दाखल झाल्यानंतर इतर टेस्ट केल्या गेल्या.

डॉ. स्वप्निल भालेकर यांनी गायत्रीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली. अडीच तास ही शस्त्रक्रिया चालली. काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिल्यानंतर गायत्री कोपरगावात आली. डोळ्यावरील पट्ट्या काढण्यात आल्या आणि गायत्रीची गेलेली दृष्टी परत आली.यावेळी अभिनेते सोनू सूद यांच्या आभार मानण्यासाठी गायत्रीच्या आई-वडिलांनी छोटेखानी कार्यक्रम घेऊन सोनू सूद यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभार मानले यावेळी प्रसंग सांगताना गायत्रीचे डोळे पाणावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *