पत्रकार उद्धव फंगाळ यांनी सहकुटुंब केली विठ्ठल वारी!

पत्रकार उद्धव फंगाळ यांनी सहकुटुंब केली विठ्ठल वारी !


पत्रकारांच्या हितासाठी घातले विठ्ठलाला साकडे !

जळगाव प्रतिनिधी – दैनिक विदर्भ सत्यजित व दैनिक साई संध्याचे संपादक मेहकर जिल्हा बुलढाणा येथील पत्रकार उद्धव फंगाळ यांनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची वारी केली यावेळी पत्रकार उध्दव फंगाळ यांनी सर्व पत्रकार बांधवांच्या चांगल्या हितासाठी विठ्ठलाला साकडे घातले आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल भगवान यांची मोठी यात्रा भरत असते यानिमित्त एक ते दीड महिन्याच्या अगोदरच महाराष्ट्रातील प्रत्येक गावांमधून दिंडी व वारकरी मोठ्या प्रमाणात विविध पालखी घेऊन पंढरपुरात दाखल होत असतात यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात जवळपास दोन अडीच महिने दिंडी वारकऱ्यांचा धार्मिक सोहळा सुरूच असतो

एक धार्मिक वातावरण महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने तयार होत असते याच पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त दैनिक साई संध्या व दैनिक विदर्भ सत्यजितचे संपादक उध्दव फंगाळ यांनी त्यांच्या सहकुटुंबासह पंढरपूर वारी केली या दरम्यान श्री विठ्ठलाला साकडे घालताना पत्रकार उध्दव फंगाळ म्हणले की महाराष्ट्र मध्ये अलीकडच्या काळात पत्रकारावर येत असलेला दबाव, षडयंत्र पत्रकारावर होणारे हल्ले यासंदर्भात विठ्ठलाकडे साकडे घालून भविष्यात येणारे दिवस हे पत्रकार बांधवांसाठी चांगले यावे पत्रकारांच्या कुटुंबामध्ये चांगले दिवस येऊन एक रोखठोक व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्व पत्रकारांना लिखाण करता यावे शासनाकडून पत्रकारांसाठी संरक्षण व विविध सवलती देण्यात याव्यात ग्रामीण भागातील पत्रकारांची सध्या दयनिय अवस्था आहे कोणत्याच पेपर वाल्याकडून ग्रामीण भागातील पत्रकारांना कोणतेही आर्थिक सहकार्य मिळत नाही शिवाय ग्रामीण भागातील पत्रकारावर एखांदा वाईट प्रसंग आल्यास पेपर वाल्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद किंवा खंबीर पाठिंबा या बिचार्‍या पत्रकाराला मिळत नाही असे अनेक प्रकार महाराष्ट्र मध्ये सुरू आहेत

त्यामुळे खरी, रोखठोक व सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमध्ये उदासीनता दिसून येत आहे पत्रकार हा लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ आहे पत्रकारांना स्वतंत्रपणे लिखाण करता यावे यासाठी सर्व पत्रकार बांधव धडपड करत असतात मात्र हे लिखाण करत असताना अनेक ठिकाणी पत्रकारावर दबाव तंत्राचा वापर होतो असे प्रकार भविष्यात घडू नये एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी पत्रकारांचे लिखाण सुद्धा चांगले असले पाहिजेत पत्रकार बांधवांनी आपले कुटुंब सांभाळून समाज हितासाठी काम करावे व येणारा काळ हा पत्रकारांसाठी चांगला असला पाहिजे असे साकडे पत्रकार उद्धव फंगाळ यांनी श्री विठ्ठलाकडे घातले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *