लोणी खु ता.पारोळा येथे विठ्ठल मंदीर जिर्णोध्दारासह विविध विकासकामांचा भुमीपुजन सोहळा अमोल चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न….
पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील. पारोळा – तालुक्यातील लोणी खु येथे आमदार चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतुन मुलभुत सुविधेसह विविध कामांना मंजुर मिळाली आहे. या विकासकामांचे आज अमोल पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन करण्यात आले. तसेच गावातील भाविकांचे मोठे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल मंदीर जिर्णोध्दार सोहळा मोठ्या उत्साहात व अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.प्रसंगी तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष नाना पाटील, लोणी येथील कौतिक पाटील, प्रमोद पाटील, पारोळा येथील पंकज मराठे, कोमल पाटील यांसह लोणी व परिसरातील ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासोचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.