आदर्श प्राथमिक विद्यालय पिंप्री येथे धरणगाव न्यायालयतर्फे कायदेविषयक शिबीर संपन्न.

आदर्श प्राथमिक विद्यालय पिंप्री येथे धरणगाव न्यायालयतर्फे कायदेविषयक शिबीर संपन्न…..कायदा तुमच्या संरक्षणासाठी , भरपूर शिका आपले ध्येय निश्चित करा व यश संपादन करा. न्यायाधीश अविनाश ढोके साहेब.धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,आज 30 ऑगस्ट 2024 रोजी आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात धरणगाव न्यायालया तर्फे पोक्सो कायदा बाबतीत जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम मान्यवर यांचे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे स्वागत केले.धरणगाव तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सन्माननीय प्रमुख न्यायाधीश महोदय  अविनाश ढोके साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पोक्सो कायदा कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरास विधीज्ञ महेंद्र चौधरी साहेब यांनी लैंगिक अत्याचार , विकृत गुन्हेगार ,गोपनीयता यावर माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .विधीज्ञ गजानन पाटील साहेब यांनी मुलां- मुलींच्या संरक्षण साठी पोक्सो कायदा तसेच पालक व शिक्षक यांची भूमिका , गुड टच – बॅड टच याविषयी मार्गदर्शन केले. विधी सेवा समिती ,धरणगाव तालुका वकील संघ दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून न्यायाधीश महोदय यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती ,अभ्यासाची जोड व शारीरिक बदल , उज्वल भविष्य साठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. या बाबतीत मार्गदर्शन केले.प्रसंगी धरणगाव वकील संघाचे अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ आर एस शिंदे साहेब , मनोज दवे साहेब , जेष्ठ विधीज्ञ बी के आवारे साहेब , एकनाथ पाटील साहेब , संदीप पाटील ,एस पी चौधरी , ईश्वर चौधरी , योगेश शिंदे आदींसह पोलीस पाटील गोपाल बडगुजर , संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद चौधरी , सचिव विनोद चौधरी ,आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली चौधरी , आदर्श माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विशाल सपकाळे , राकेश पावरा , आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते . प्रश्नोत्तरे माध्यमातून प्रमुख वक्ते व विद्यार्थी यांचे संभाषण होत पोक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती मिळाली. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.सूत्रसंचालन सतिष शिंदे तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *