मेष : आज तुम्ही कठोर परिश्रम कराल. आज होणारा आर्थिक नफा तुम्हाला दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे प्रेम जीवन तुमच्या आजच्या व्यावसायिक जीवनासारखेच उत्कृष्ट असेल. तुम्ही चांगले संवाद साधता याची खात्री करा. अविवाहितांना जोडीदार भेटेल.
वृषभ : आजचा दिवस सुखदायक आणि प्रेमाने परिपूर्ण असा असेल. तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मात्र जोडीदाराकडून तुमच्यावर आरोप होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला नातेसंबंधातील विश्वास दृढ करावा लागेल. वादविवाद टाळा.
मिथुन : बदलते ग्रहमान तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल. तुमच्या कामांना गती मिळेल. जोडीदाराची मदत लाभेल. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असला तरी जोडीदाराबाबत तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही वेळ काढाल.
कर्क : तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही व्यवस्थित पाडाल. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये लाभ मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. घरातील कोणत्याही सदस्याच्या लग्नाच्या चर्चा आणि तयारीला वेग येईल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुम्ही संयम राखा. प्रयत्नात कसूर होणर नाही याची काळजी घ्या. जबाबदारीचे ओझे वाढू शकते.
सिंह : आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तुम्ही नवीन व्यवसाय उपक्रम सुरु करण्याचा विचार कराल. जोडीदारामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात,
कन्या : तुमच्यासाठी आजच्या दिवसाचे सकारात्मक असेल. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. कोणत्याही गोष्टींमध्ये घाई करू नका, तुमच्या कामाला तुमच्याकडून खूप वेळ आणि लक्ष देण्याची गरज आहे,
तूळ : तुमच्या सहकार्यामुळे आज तुमचा व्यवसाय नवीन स्तरावर जाईल. तुमच्या व्यवसाय भागीदाराचे कौतुक करा, भविष्याबाबत अतिविचार करु नका. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करा. कोणताही निर्णय घेताना घाई करुन नका
वृश्चिक : आज जीवन तुमच्यासाठी एक नवीन दृष्टीकोन घेऊन येईल. तुमच्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे महत्त्वाचे आहे. आज तुम्ही प्रवास करत नसला तरीही तुमचा दिवस खूप मजेशीर जाण्याची शक्यता आहे. आज पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
धनु : आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ व्यतित कराल. आरोग्य सुधारण्यासाठी काम करावे लागेल. जोडीदाराचे वर्तन तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. व्यवसायात संथपणा अनुभवाल. आजचा दिवस व्यवसायासाठी तटस्थ आहे,
मकर : आज तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहिल.
कुंभ : आज तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल. जीवनसाथी, मित्र आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याने तुमची कामे लवकरच पूर्ण होतील. आज सकारात्मक निर्णय घ्या. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
मीन : आज तुमचा दिवस समाधान देणार असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही दिवसभर चांगला मूडमध्ये असाल. तुमचे प्रेम जीवन खूप बहरेल. व्यवसायात नवी संधी अनुभवला. आजचा आर्थिक फायदा भविष्यातील गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल.