डी एस देशमुख विद्यालयात पालक शिक्षक सह विचार सभा क्रमांक एक संपन्न.

डी एस देशमुख विद्यालयात पालक शिक्षक सह विचार सभा क्रमांक एक संपन्न

भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे

थोरगव्हाण येथिल डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे 09 जुलै 2024 रोज मंगळवार या दिवशी पालक शिक्षक संघ सहविचार सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस वैष्णव होते. सभेत सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षाची कार्यकारणी सर्वानुमते स्थापन करण्यात आली. ती खालील प्रमाणे शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस एस वैष्णव, उपाध्यक्ष पालकांमधून संतोष प्रकाश राणे, सचिव शिक्षकांमधून प्रशांत चुडामन कचरे , सहसचिव पालकांमधून विजय पुरुषोत्तम चौधरी, सहसचिव विद्यार्थ्यांमधून इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कुमारी सुरेखा नितीन कोळी सहविचार सभा आनंदात पार पडून शैक्षणिक समस्या विषयी विचार विनिमय करण्यात आला .

वर्गनिहाय शिक्षक पालक कार्यकारणी निवड झाली पाचवी अ वर्गशिक्षक एस एस वैष्णव पालक शांताराम मधुकर कोळी, पाचवी ब वर्गशिक्षक एन ए देशमुख पालक तुषार मुरलीधर कोल्हे, सहावी अ वर्गशिक्षक सौ एन डी पाटील पालक सुपडू भागवत तायडे, सहावी ब वर्गशिक्षक एस पी पाटील पालक अमोल प्रभाकर झोपे, सातवी अ वर्गशिक्षक एन बी चौधरी पालक सौ स्नेहल विजय पाटील, वर्ग शिक्षक सातवी ब एम के पाटील पालक राजेश विनायक कोल्हे, आठवी अ वर्ग शिक्षक जे पी चौधरी पालक मोहीद्दीन शाह मेहमूद शहा फकीर, आठवी ब वर्ग शिक्षक वाय जे कुरकुरे पालक सौ प्रतिभा उमाकांत धनगर , नववी अ वर्ग शिक्षक टी पी घुले पालक सचिन वसंत कोळी, नववी ब वर्गशिक्षक के एम पाटील पालक सुरेश शिवराम ठाकरे, दहावी अ वर्गशिक्षक के पी चौधरी पालक रवींद्र जगन्नाथ कोळी, दहावी ब वर्गशिक्षक पी सी कचरे पालक सुनील अशोक तायडे, अकरावी वर्ग शिक्षक वाय डी कोष्टी पालक शकुंतला पंडित चौधरी , बारावी वर्गशिक्षक सौ श्रीमती एस पी तायडे पालक मनोहर श्रीराम इंगळे यांचीही सर्वानुमते निवड संपन्न झाली . सभा कार्यक्रम स्थळी सुंदर फलक लेखन कला शिक्षक एस बी सपकाळे यांनी केले . मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी सर्वांचे अभिनंदन केले . पर्यवेक्षक डी के पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला सचिव शिक्षक पी सी कचरे यांनी प्रास्तविक, सुत्रसंचालन ,आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *