मेष : आज कोणतीही प्रलंबित सरकारी काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख आणि शांतीला तुमची प्राथमिकता असेल. मुलांच्या अभ्यासाबाबत किंवा करिअर चिंता वाटेल. अचानक खर्च वाढल्याने तुमचे आर्थिक बजेट कोलमडू शकते. सामाजिक कार्यात काम करताना नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
वृषभ : समस्या परस्पर सामंजस्याने सोडवाल. जुने मतभेद आणि गैरसमज दूर होतील. व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना यश मिळेल. एखाद्या विशिष्ट कामात व्यत्यय आल्याने मित्राच्या वर्तनाबाबत संशय येईल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढवू नका. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. व्यवसायात काही आव्हानांचा सामना करावा लागेल. जोडीदाराच्या तब्येतीत चढ-उतार होतील. अति परिश्रमामुळे आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : आज कुटुंबातील सदस्यांसोबत संवादातून समस्येवर तोडगा काढा. भाऊ आणि नातेवाइकांमध्ये सुरू असलेला वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवला जाऊ शकतो. अनेक बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. राग आणि घाईमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. व्यावसायिक कामात काही अडचणी येऊ शकतात. घर-कुटुंब आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. थकवा आणि तणावाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल.
कर्क : आज संततीशी संबंधित कोणतेही विशेष काम पूर्ण केल्याने आराम मिळेल. वैयक्तिक कामांवर पूर्ण लक्ष द्या. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. अनावश्यक खर्चात कपात करा. विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायातील क्षेत्राशी संबंधित योजनेवर गांभीर्याने काम करा. पती-पत्नीमध्ये सुरू असलेले मतभेद दूर होतील.
सिंह : आज मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. जाणकारांचा तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. आर्थिक मंदीमुळे खर्चात कपात करावी लागेल. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. व्यवसायात गांभीर्याने काम करण्याची गरजचे आहे. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्य चांगले राहिल.
कन्या : कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. आर्थिक उपक्रम आयोजित करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. तुमच्या उपक्रमांचा फार कमी लोकांना फायदा होऊ शकतो. नातेवाइकांशी पैशाबाबत व्यवहार करताना नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित तुमची कोणतीही कृती फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा
तूळ : आज तुम्हाला फोन कॉलद्वारे एक महत्त्वाची सूचना प्राप्त होऊ शकते. त्याची तातडीने अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही वेळ जाईल. भविष्यातील कोणतीही योजना बनवताना तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. इतरांवर विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. जोडीदाराचा पाठिंबा राहिल. मायग्रेनचा त्रास कायम राहू शकतो.
वृश्चिक : आज कोणत्याही बेकायदेशीर कामांकडे लक्ष देवू नका. वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करा. कोणतीही दीर्घकाळची चिंता आणि तणाव दूर होऊ शकतो. काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. यावेळी जमीन खरेदीशी संबंधित कामांमध्ये जास्त लाभाची अपेक्षा करू नका. अधिक अपेक्षामुळे नुकसान होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायात क्षेत्राशी संबंधित योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.आरोग्याची नियमित तपासणी टाळू नका.
धनु : आजचा बराचसा वेळ घरगुती कामात व्यतित कराल. धार्मिक संस्थेशी संबंधित कामातही हातभार लावाल. तुमचा आदरही वाढू शकतो. आळशीपणामुळे कामे रखडतील. तुमच्या संशयास्पद स्वभावाचा इतरांना त्रास होईल. वेळेनुसार तुमच्या वागण्यात बदल करा. कोणतेही नवीन कामही सुरू होईल. कार्यालयान अधिकार्यांशी गोड संबंध ठेवतील. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ जाईल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
मकर : आज जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल. आज तुम्हाला काही शुभ सूचना मिळू शकतात. काही लोक तुमच्यासाठी त्रास देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू नका. ळी काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक असेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी सुसंवाद राहील. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. प्रकृती उत्तम राहिल.
कुंभ : आज कुटुंबासह मनोरंजन आणि खरेदीत आनंददायी वेळ जाईल. तुम्ही घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक होईल. आर्थिक दृष्टीकोनातून विशेष सकारात्मक परिणाम न मिळाल्याने निराशेची भावना असेल. नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. व्यवसायातील प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित योजनांचे ज्ञान तुम्हाला मिळेल. पती-पत्नी एकमेकांच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकतील. पोट खराब झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल.
मीन : आज घर साफसफाई आणि इतर कामात वेळ जाईल, असे गणेश सांगतात. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत संवाद साधा. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या समस्या दूर होतील. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका. जवळच्या मित्राची अप्रिय बातमी मिळाल्याने मन उदास होईल. व्यवसायाशी संबंधित प्रकल्पाबाबत समस्या उद्भवू शकतात. पती-पत्नी एकमेकांच्या सामंजस्याने योग्य ती व्यवस्था करतील. धोकादायक कामे टाळा.