देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात हर घर तिरंगा उपक्रम राबविला गेला,त्या पार्श्वभूमी वर सायगाव येथे समाज सुधारक व क्रांतिकारी वेशभूषा करून चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकली.दिपप्रज्वलन तसेच भारत माता प्रतिमेचे पूजनाचा यंदाचा मान त्रिपुरा,आसाम BSF येथे देशसेवा बजवत असलेले सूर्यवंशी यांचे आई-वडील “सैनिक माता पिता” यांच्या शुभहस्ते झाले.तसेच मीना व सुनील सूर्यवंशी या सैनिक माता पिताचा भारती सूर्यवंशी तसेच विश्व राजभारती संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र सूर्यवंशी(राजू बाबा) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.संयुक्त राष्ट्रात शांतता राखण्यासाठी जागतिक संघटनेत18 वर्ष देशसेवा बजावलेले तसेच पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी असलेले आजच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वीर पूजनाचा मान यावेळी अतिथी मान्यवर.सहा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सुर्यवंशी साहेब यांना मिळाला.संस्थेच्या मुख्याध्यापिका प्रिया सूर्यवंशी यांना ध्वज पूजनाचा मान मिळाला.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे, शिक्षण हेच कर्म व समाजसेवा हाच धर्म मानणारे, टीचर्स अँड लॉ स्टुडन्ट असोसिएशन तथा विश्व राजभारती संस्थेचे संस्थापक भूषणजी सूर्यवंशी सर होते. त्यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण” झाले. या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम गुरुकुल च्या प्रांगणात झाला,यावेळी भारत माता की जय. हर घर तिरंगा… हर मन तिरंगा… वंदे मातरम… गिरणा नदी का धो-धो पाणी हम सब बच्चे हिंदुस्तानी च्या घोषणांनी परिसरात चैतन्याचे वातावरण तयार झाले होते.यावेळी जयघोषात विद्यार्थ्यांची परेड पार पडली तसेच उपस्थित मान्यवरांसमोर देशभक्तीपर गायन, मराठी ,हिंदी ,इंग्लिश या भाषेतून उत्कृष्ट भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली यावेळी चिमुकल्यांनी भाषण व समाजसुधारकांच्या वेशभूषा करून प्रेक्षकांची मने जिंकत कौतुकाचे थाप मिळवली.विश्व राजभारती संस्थेच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व SRSS विश्व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.यावेळी विश्व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक तथा सचिव शुभम सुर्यवंशी , सक्षम फाउंडेशन अध्यक्षा तथा गुरुकुलच्या प्रिन्सिपल पी.बी.सूर्यवंशी ,जे.एस.पगार,ए.एस.बच्छे,एम.एन.माळी,व्ही.एस.पाटील , एल एस भदाणे एम एन मंसूरी, व्ही एस खैरनार,सचिन पगार,शाम शिंदे,नाना देवरे, लखन वाघ तसेच कार्यक्रमाचे संयोजक डी एस कुलकर्णी , राहुल शिंदे आदी शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.यावेळी उत्कृष्ट असं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली पाटील व लीना भदाणे यांनी केले. तसेच उपस्थित पंचक्रोशीतील मान्यवरांचे आभार संस्थेच्या वतीने प्रिन्सिपल प्रिया सूर्यवंशी यांनी मानले.
Related Posts
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर…
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर… धरणगाव नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर – गुलाबराव देवकर धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, धरणगाव – येथील नगरपरिषदेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधांचा संदर्भात निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरपरिषद धरणगाव मार्फत १० ते १२ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठा गढूळ आणि […]
धरणगावात श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे एकदिवसीय बासरीवादन कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन.
धरणगावात श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे एकदिवसीय बासरीवादन कार्यशाळेचे विनामूल्य आयोजनधरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,धरणगाव:- येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, धरणगाव तर्फे दि. १ सप्टेंबर, रविवारी सकाळी ८.३० ते सायं ५. ३० या वेळेत एक दिवसीय विनामूल्य बासरीवादन कार्यशाळेचे आयोजन श्री आ.दि.जैन मंदिर सभागृह येथे होणार आहे. भारतीय संगीतामध्ये आद्यवाद्य […]
अनुसूचित जाती जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन.
अनुसूचित जाती , जमतीच्या उपवर्गिकरण विरोधात प्रसंगी राज्यभर आंदोलन करणार :मुकुंद सपकाळे यांचा निर्धारजळगाव :- अनुसूचित जाती , जमातीचे उपवर्गिकरण करणे , त्यांना क्रिमिलेयर लावणे संदर्भात सर्वोच्य न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णतः संविधान विरोधी असल्याने आम्ही प्रसंगी राज्यभर आंदोलन करू कारण सर्वोच्य न्यायालया पेक्षा संसद व संविधान श्रेष्ठ आहे असे स्पष्ट प्रतिपादन आरक्षण बचाव संघर्ष समितीचे […]