देवरे विद्यालय संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब देवरे यांच्या बाराव्या पुण्यतिथी निमित्ताने बक्षीस वितरण व पालक मेळावा संपन्न.

देवरे विद्यालय संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब देवरे यांच्या बाराव्या पुण्यतिथी निमित्ताने बक्षीस वितरण व पालक मेळावा संपन्न.

विखरण-ता.नंदुरबार येथील श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्व.आप्पासाहेब आत्माराम धवळू देवरे यांच्या बाराव्या पुण्यतिथी स्मरणार्थ बक्षीस वितरण व पालक मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी ता.साक्री‌ जि.धुळे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आत्माराम देवरे से.नि.विभागीय परीवहन अधिकारी,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डाएट प्राचार्य डॉ.भारती बेलन, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील पं.स.नंदुरबार, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत चौरे,एस. एन.पाटील जेष्ठ साहित्यिक, व्याख्याते एम. के.भामरे,संस्थेचे सचिव नरेंद्र आत्माराम देवरे,प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते, प्रा.एल.जी.सोनवणे से.नि.प्राध्यापक सि.गो.पाटील महाविद्यालय,साक्री ग्रामपंचायत म्हसदी येथील सरपंच शैलजा राजेंद्र देवरे, गंगामाता कन्या विद्यालयाच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका वर्षा नरेंद्र देवरे, संस्थेचे संचालक वेडू दशरथ खैरनार,संस्थेचे संचालक पुंजाराम मोतीराम पाटील, दिलीप रूपचंद देवरे, रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव चावरा पब्लिक स्कूलचे फादर टेनी,से.नि.प्राचार्य एन.डी. नांद्रे, खोंडामळी केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख आनंदराव करणकाळ, गोकुळ खैरनार, सुभाष अकलाडे, गोपाळ अकलाडे, विनायक देवरे, रत्नाकर बागुल, एस.एन. देवरे,कृषी मित्र सुभान पिंजारी ग्रामीण व्यथाचे प्रतिनिधी सुरेश सुतार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलना नंतर, आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे यांच्या कारकिर्दी विषयी व शाळेविषयी अहिराणी मराठी, हिंदी व इंग्रजी मधून विद्यार्थ्यांनी आपली भाषणे मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी केले.

तसेच विद्यार्थ्यांनी विविध गीते सादर करत विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी परीक्षेत उत्तीर्ण प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी उच्च प्राथ. शिष्यवृत्ती(इ.५वी) पूर्व माध्य.शिष्यवृत्ती(इ.८वी), एन.एम.एम.एस., एम.टी. एस.परीक्षा,क्रीडा स्पर्धेत तालका, जिल्ह्यात यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे,प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आली.विद्यालयाचे लिपिक रवींद्र मोतीराम पाटील यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती प्रीत्यर्थ विद्यालयाकडून सन्मान करण्यात आला. विद्यालयाकडून स्मार्ट दूरदर्शन संच सप्रेम भेट देऊन करण्यात आला.तसेच अध्यक्ष राजेंद्र देवरे त्यांच्या धर्मपत्नी म्हसदी ग्राम पंचायतीच्या सरपंच सौ. शैलजा देवरे यांना महाराष्ट्र शासनाने आयोजित स्व.आर.आर.पाटील स्मार्ट ग्राम योजना अभियान अंतर्गत जिल्ह्यातून रु.50 लाखांचे पारितोषिक मिळाल्याबद्दल विद्यालयातील कर्मचारी वर्गाकडून सन्मान करण्यात आला.पालकांमधून काशिनाथ पाटील यांनी सर्व शिक्षकांना सन्मानीत केले.तसेच विद्यालयाचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी दीपेश मनोहर लोहार याने रेखाटन केलेल्या स्वर्गीय आप्पासाो.देवरे यांच्या फ्रेमचे अनावरण करण्यात आले.उपस्थितांनी आरेखानाचे कौतुक करत रोख स्वरूपात बक्षीसे दीपेशला प्रदान करण्यात आली. तसेच कु.देवर्षी पाटील,जितेंद्र पाटील,सिद्धी मराठे,रुपेश पाटील,सुवर्णा पाटील यांच्या मनोगतांनी उपस्थितांचे मनं जिंकलीत. मान्यवरांनी रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीसे प्रदान करण्यात आली.रोटरी क्लब ऑफ नंदुरबार तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांचा सपत्नीक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे यांनी गौरव केला.प्रमुख मान्यवर एम.के.भामरे यांनी संस्थेच्या, शाळेच्या कार्याचे, विद्यार्थी पालक शिक्षक,शालेय प्रगती आलेखाचे कौतुक करत आले.म्हसदी येथील अविनाश पोपट देवरे यांनी स्व.आप्पांच्या कारकिर्दीविषयी व दातृत्वशील देवरे परिवाराविषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.एल.जी.सोनवणे यांनी कालची पिढी -आजची पिढी,आप्पांची दूरदृष्टीने शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदल याविषयी मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणातून राजेंद्र देवरे यांनी संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या प्रगती विषयी समाधान व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.सदर बक्षीस वितरण समारंभाला म्हसदी पंचक्रोशीतील आप्पांचे मित्रपरिवार,विखरण,नाशिंदे, बोराळा, खापरखेडा,खोंडामळी येथील पालकवर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक डी.बी.भारती व आभार डॉ.आर.आर.बागुल यांनी मानले.सर्व उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.कार्यक्रमाचे संयोजन उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे, एम.डी.नेरकर, वाय.डी. बागुल,व्ही.बी.अहिरे,एस.एच. गायकवाड,एम.एस.मराठे,डी. बी.पाटील,एस जी.पाटील,एच. एम.खैरनार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *