अँग्लो उर्दू हायस्कुल ज्यु . कॉलेज शिक्षक भरती पारदर्शीपणे राबवा, संचालक मंडळाची मागणी.

नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अँग्लो उर्दू हायस्कुल ज्यु . कॉलेज शिक्षक भरती पारदर्शीपणे राबवा, संचालक मंडळाची मागणी


नंदूरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे

नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित अग्लो उर्दू हायस्कुल ज्यु . कॉलेज येथे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व जिल्हा प्रशासनाच्या निगराणीत व्हावी या मागणीसाठी आज संस्थेच्या संचालक मंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.सदर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे, शाळेच्या मुख्याध्यापकाने वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत नमुद केलेल्या प्रमाणे सदर मुलाखतीवेळी उमेदवाराची लेखी परिक्षा , वर्गपाठ आदी घेण्यात येणार आहे.

तरी संस्थेच्या वतीने प्रशासनाकडे विनंती करण्यात आली आहे की , सदर भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी यांच्या नेमणुकीद्वारे पारदर्शी व सीसीटीव्ही सर्वेक्षण क्षेत्राखाली करण्यात यावी जेणेकरुन सदर भरती प्रक्रिया राबवितांना आर्थिक देवाण – घेवाण होणार नाही व गुणवत्तापूर्ण किंवा सक्षम उमेदवारावर अन्याय होणार नाही . कारण यापूर्वी अँग्लो उर्दू हायस्कुल व ज्युनियर कॉलेज व अलहाज काझी चिरागोद्दीन प्राथमिक शाळा या संस्थेत माजी संस्था चालकांनी भरती करतांना उमेदवाराची कोणतीही गुणवत्ता न पाहता फक्त कुटूंबातील सदस्यांनाच सदर संस्थेत भरती केले गेले आहे .

तसेच मुख्याध्यापक व माजी संस्थाचालक यांनी संगनमत करून त्यांनी ठरवलेले उमेदवर भरती करणार आहेत .यामुळे गुणवत्तापूर्ण उमेदवारा वर अन्याय होऊ शकत. जे उमेदवार गुणवत्तापूर्ण , सक्षम असतील त्यांनाच भरती करण्यात यावे . जेणे करून शिक्षणाचा दर्जा सुधारून या शिक्षकांच्या माध्यमातून एक आदर्श पिढी घडण्यासाठी मदत होईप.या मागणीसाठी आज उपजिल्हाधिकारी हरीष भामरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार व शिक्षणाधिकारी भावना गवळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हाजी अब्दुल गफ्फार अब्दुल रहेमान पिंजारी , जाकीरमियाँ मुसामियाँ जहागिरदार , शेख मजहरोद्दीन सर , कमरअली सैय्यद साहब , लियाकत बागवान , रशिद मिर्झा , शकिल मन्सुरी , अस्लम चौधरी , रफिक शहा व इतर पालक वर्ग उपस्थित होते…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *