अवैध दारुभट्ट्यांवर यावल वनविभागाची कारवाईआज रोजी सकाळी यावल वनपरिक्षेत्र यावल पूर्व अंतर्गत नियतक्षेत्र बोरखेडा बुद्रुक, कक्ष क्र. 35 मध्ये महसुली हद्दीपासून 500 ते 1000 मीटर अंतरावर चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरामध्ये वन विभागाने कारवाई करत 2 अवैध गावठी दारू भट्ट्यांसह 8 बॅरल गावठी दारूचे रसायन (1600 लिटर) किंमत 56000 व प्लास्टिक बॅरल जागेवरच नष्ट केले असून 4 लोखंडी बॅरल व अन्य लोखंडी साहित्य अंदाजे किंमत रु.2000 जप्त करण्यात आले, सदर कारवाईत वनरक्षक बोरखेडा बुद्रुक यांचेकडील प्र.रि. क्र. 08/2024 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरील कारवाई धुळे वनसंरक्षक निनु सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल परिक्षेत्र विभागाचे सहाय्यक वनसंरक्षण समाधान पाटील, स्वप्नील फटांगरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यात पथकातील वनपाल गस्तीपथक आर. एम. जाधव, आर. बी. थोरात, वनरक्षक प्रकाश बारेला, नानसिंग बारेला, सुपडू सपकाळे, राजू बोंडल, बालाजी जोहरी, इंद्रकुमार लखवादे, मनीष बारेला, अनिल बारेला, कॉन्स्टेबल सचिन तडवी, वनसेवक अस्लम, शालम तसेच वाहनचालक आनंदा तेली, सचिन चव्हाण, अमोल पाटील, कर्मचारी उपस्थित होते.