राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गादीवर देखील दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीचे उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीसाठी मागील दहा-पंधरा दिवसांपासून सुरु असलेला प्रचार आता संपला आहे. उमेदवार आता गाठीभेटींवर भर देत आहेत. दरम्यान सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी प्रचार थांबला अंडी नंतर रात्री उशिरापर्यंत काही उमेदवार हे घरी जात होते. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील सेल्सुरा फाटा येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात उमेदवार दिलीप मस्के हे जखमी झाले आहेत. दरम्यान मस्के यांना तातडीने हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे. या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे. हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली.
Related Posts
अवैध दारुभट्ट्यांवर यावल वनविभागाची कारवाई
अवैध दारुभट्ट्यांवर यावल वनविभागाची कारवाईआज रोजी सकाळी यावल वनपरिक्षेत्र यावल पूर्व अंतर्गत नियतक्षेत्र बोरखेडा बुद्रुक, कक्ष क्र. 35 मध्ये महसुली हद्दीपासून 500 ते 1000 मीटर अंतरावर चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरामध्ये वन विभागाने कारवाई करत 2 अवैध गावठी दारू भट्ट्यांसह 8 बॅरल गावठी दारूचे रसायन (1600 लिटर) किंमत 56000 व प्लास्टिक बॅरल जागेवरच नष्ट […]
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; जामखेड शहरावर पसरली शोककळा.
मन सुन्न करणारी घटना.! नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; जामखेड शहरावर पसरली शोककळा जामखेड, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील बराटे वस्ती येथील १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज मंगळवारी २५ जुन रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रहात्या घरात घडली. […]
युवा खासदार तथा संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे यांचे एरंडोल विधानसभा मतदारसंघात झाले स्वागत.
युवा खासदार तथा संसदरत्न .डॉ.श्रीकांत शिंदे यांचे एरंडोल विधानसभा मतदारसंघात झाले स्वागत…पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील.शिवसेना जनसंवाद दौऱ्याचा निमित्ताने विधानसभा निहाय पदाधिकारी लोकप्रतिनिधी संवाद व आढावा बैठकीसाठी युवा खासदार तथा संसदरत्न . डॉ.श्रीकांत शिंदे हे जळगांव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज जळगांव जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांतील आढावा घेवुन डॉ. श्रीकांत शिंदे हे धुळ्याचा दिशेने जात असतांना पारोळा […]