१७ संवर्ग पेसा भरती तात्काळ पूर्ववत करण्याबाबत NSUI महाराष्ट्र यांना यांना निवेदन

१७ संवर्ग पेसा भरती तात्काळ पूर्ववत करण्याबाबत आज दिनांक १२/०६/२०२४ रोजी धनंजय चौधरी जनरल सेक्रेटरी NSUI महाराष्ट्र यांना यांना निवेदन देण्यात आल..

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मागील वर्ष २०२३ ला पेसा भरतीचे १७ संवर्गामधील विविध विभागाचे जाहिराती प्रसिध्द झाले होते. त्या जाहिरातीमध्ये नॉन पेसाचे रिक्त पदे सुद्धा होती. काही विभागाच्या परिक्षा झाल्या तर काहींचे परिक्षा होणे अद्याप बाकी आहे, तसेच तलाठी, वनरक्षक, शिक्षक व आरोग्यसेवक या पदांची पेसा भरतीचे सर्व प्रक्रिया पार पडले, पण पेसा उमेदवारांची अंतिम निवडसूची व नियुक्ती आदेशाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही पेसा उमेदवारांना वगळून नॉन पेसा उमेदवारांना नियुक्त्या देणे, हे पेसा उमेदवारांवर अन्याय होत आहे. हा अन्याय तात्काळ थांबवण्यात यावा व पेसा उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे.

तसेच जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणारी पेसा भरतीचे चित्र यापेक्षा विदारक आहे. ऑक्टोबर २०२३ ला पशुधन पर्यवेक्षकची परिक्षा घेन्यात आली पण आजतागायत त्याचा निकाल जाहीर झालेल्या नाही. निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवार नैराश्याच्या गर्तेत ओढले जात आहेत. कृपया पशुधन पर्यवेक्षकचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यात यावेत, तसेच जिल्हा परिषद अंतर्गत पेसा भरतीतील आरोग्यसेवक, ग्रामसेवक यांची परिक्षा आतापर्यंत झालेली नाही, परिक्षार्थी रात्र दिवस अभ्यासिकेत पुस्तके चाळत आहेत. पण अद्याप जिल्हा परिषद पेसा भरतीचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आलेले नाही. पण यातच नॉन पेसा उमेदवारांचे परिक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करुन व पेसा उमेदवारांचे वेळापत्रक प्रसिद्ध न करुन, पेसा उमेदवारांवर घोर अन्याय होत आहे. कृपया पेसा व नॉन पेसा यांची पदभरती परिक्षा एकत्रितरित्या घेण्यात यावी, आमच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून आमच्या खालील मागण्यांचा योग्य विचार करावा, या अपक्षेने आपणास निवेदन सादर करण्यात आले.

1) पेसा भरतीचे नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावे.
2) पेसा भरती अंतर्गत झालेल्या पशुधन पर्यवेक्षक व इतर परिक्षाचे निकाल व निवड यादी तात्काळ जाहीर करण्यात यावे.
3) आरोग्यसेवक यांचे स्थगीत झालेले नियुक्ती आदेश पूर्ववत करण्यात यावे.
4) वनरक्षक भरती नॉन पेसा वाल्यांना ज्या तारखेपासून नियुक्ती दिले आहेत, पेसा
उमेदवारांना सुध्दा त्याच तारखेपासून नियुक्ती द्यावी.

5) ZP अंतर्गत राबविण्यात येणारी भरती ही पेसा वगळून न होता, पेसा व नॉन पेसा ची परिक्षा एकाच कालावधीत घेण्यात यावी,
6) जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पेसा मधील ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरती परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावे.
7) पेसा अंतर्गत राबवावयात येणारी शिक्षक भरतीतील उमेदवारांना नियुक्ती लवकरात लवकर देण्यात यावे.
8) पेसा ची निवडयादी प्रसिद्ध करून नियुक्ती आदेश देण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *