घरफोडी चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात..

 घरफोडी चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात..

अमळनेर परिसरातील वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव ांनी श्री. बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना घरफोडी चोरीचे गुन्ह्यांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणण्या बाबत आदेश दिलेत.

स.पो.नि. विशाल पाटील तसेच अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेका / कमलाकर बागुल, पोहेकॉ संदिप पाटील, पोहेको / प्रविण मांडोळे, पोकॉ ईश्वर पाटील, चालक पोकॉ मोतीलाल चौधरी अशांचे पथक तयार करुन त्यांना अमळनेर शहर व तालुका परिसरातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी मार्गदर्शन केले होते.

सावखेडा ता. अमळनेर येथील घरफोडी करणारा आरोपी किरण बारेला हा टाकळी प्र.दे. ता. चाळीसगांव येथे असल्याची गोपनिय माहिती पोहेकॉ प्रविण मांडोळे यांना मिळाली होती. सदर बातमी वरुन मा.व.पो.नि. श्री. बबन आव्हाड यांनी वर नमूद पथकास तुम्ही तात्काळ सदर ठिकाणी जावून त्या इसमाचा शोध घ्या व बातमीची शहानिशा करा असे कळविल्याने वरील स्था.गु.शा. पथकाने तात्काळ टाकळी प्र.दे. ता. चाळीसगांव येथे जावुन सदर ठिकाणी नमूद इसमाचा शोध घेवून त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आरोपी किरण तुकाराम बारेला (सोलंकी) वय २७ मुळ रा. दुदखेडा ता. सेंधवा जि. बडवाणी ह.मु. टाकळी प्र.दे. तर. चाळीसगांव असे सांगीतले. त्यास सावखेडा ता. अमळनेर येथील घरफोडी बाबत विचारण्ट करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचेवर संशय आला म्हणून पथकाने त्यास ताब्यात घेवून सविस्तर विचारपूस करता त्याने सुमारे ५ महिण्यापुर्वी सावखेडा गावी घरफोडी केल्याचे माहिती दिली आहे. सदर बाबत अमळनेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरनं. ३९/२०२४ भा.द.वि. ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यास रिपोर्टासह पुढील कारवाईकामी अमळनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, मा. सुनिल नंदवालकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *