संभाजीनगरात मातृदिनीच गर्भनिदान करणारे रॅकेट उद्ध्वस्त, 19 वर्षीय इंजिनिअर तरुणी होती मास्टरमाईंड

त्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्यासह देशभरात मातृदिन उत्साहात साजरा करत आहोत. यातच आज मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली असून गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

राहत्या घरी इंजिनिअरींग करणारी मुलगी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे.  तिच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील तिरुपती नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.  शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत गर्भनिदान केली जात असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांना मिळाली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा मारला. यावेळी एका खोलीत गर्भनिदान करण्यात येत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आले. पुरोगामी राज्य अशी ओळख असणाऱ्या राज्यात ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी आहे.

12 लाख 78 हजारांची आढळली कॅश यावेळी आरोग्य पथकाला घटनास्थळी 12 लाख 78 हजारांची कॅश देखील मिळून आली. यावेळी या तरुणीच्या खोलीत सोनोग्राफीसाठी लागणारे साहित्य,लॅपटॉप, टॅब देखील मिळून आले.

राज्यातील २२ जिल्ह्यांत लिंग गुणोत्तरचे प्रमाण घटले गेल्याच आठवड्यात राज्यातील 22 जिल्ह्यांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या चिंता वाटावी एवढी कमी झालेली आहे. राज्यात बंदी असूनसुद्धा गर्भलिंगनिदान आणि गर्भपात जोरात सुरु असल्याचं समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका पत्रात याबाबत माहिती नमूद केली आहे. जालन्यात सर्वाधिक मुलींचे प्रमाण कमी झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *