इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खुन.

इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खुन


इगतपुरी : इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा बुधवार ( ता. ७ रोजी ) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारात भरदिवसा खुन झाल्याची घटना घडली असून भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावानेच खून केला आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. इगतपुरी शहर हद्दीतील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातुन एका ५० वर्षीय व्यक्तीचा खून झाला.सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सख्खा चुलत भाऊ असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच संबंधिताचा मृत्यू झाला. या घटनेत इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी मदन बबन गोईकणे, वय ५० रा. गिरणारे ता. इगतपुरी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रामतीर्थावरून वाहून गेलेल्यायुवकाचा मृतदेह सापडला; 3 दिवसांच्या प्रयत्नांनी आपत्ती निवारणला यश
संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याच्याबरोबर सकाळी मदन गोईकणे यांचा वाद झाला होता. ह्या घटनेत अजूनही काही आरोपी आहेत अशी चर्चा ह्या परिसरात सुरु आहे. संशयित आरोपी महेंद्र गोईकणे याने धारदार शस्त्राने त्यांचा खून केल्याबाबतची फिर्याद मयताची पत्नी सिंधूबाई मदन गोईकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.या प्रकरणी इगतपुरी पोलीसांनी ह्या घटनेतील संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब दडस यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.बनावट दिव्यांग कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा? जिल्हा परिषद प्रशासनाने बोलविली बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *