धरणगाव नगरपालिकेचे आस्थापना अधिकारी योगराज जगन्नाथ तळेराव यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सेवानिवृत्ती निमित्त गोदावरी फाउंडेशन जळगाव तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव येथे आज दि. २८ जुलै रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये टुडे इको, ईसीजी, कार्डिओग्राम, रक्तदाब तपासणी, मुखडा, मूत्रपिंडातील खडे ,कान नाक घसा ,डोळ्यांचे आजार, कानाचा पडदा, टॉन्सिल ,नाकाचे हाड, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरडे पणा शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, गर्भाशयाचा ट्यूमर, गर्भाशयाचा कॅन्सर ,गर्भपिशवीच्या गाठी, अंडाशयाच्या गाठी ,सांधेदुखी, सांधे मार लागणे, फॅक्चर, कंबरदुखी, संधिवात, हाडांची झीज होणे ,अपघात व्यंग, मासपेशी वेदना, मुरूम, त्वचेचे मुरूम, त्यानंतर चेहऱ्यावरचेडाग, खाज, करणे नायटा एलर्जी, इत्यादी केस गळणे केसांचे, इतर विकार डोक्यात वाई नखांचे विकार ,लैंगिक समस्या ,कुष्ठरोग, त्यानंतरचे तळ हाताला अति घाम येणे, तसेच एन्जोग्रोफी, इंजोप्लास्टी, हृदयरोग, या सर्व विकारांवर मोफत उपचार तसेच मार्गदर्शन करण्यात आले शिबिरामध्ये एकूण 200 रुग्णांनी सहभाग नोंदवला शिबिराचे उद्घाटन जगन्नाथ तडेराव तसेच लक्ष्मीबाई तडेराव यांच्या शुभहस्ते करण्यात आले
तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे डॉ.व्ही.आर. तिवारी सुरेश सिताराम चौधरी, एडवोकेट हरिहर पद्माकर पाटील ,संदीप फुलझाडे, महिंद्र मच्छिंद्र मराठे ,तसेच माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते तसेच गोदावरी फाउंडेशन चे डॉक्टर व उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या सर्व डॉक्टरांनी खूप सहकार्य केलं तसेच शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष हेमंत महाजन तालुका सचिव राजू बाविस्कर विद्यार्थी सेनेचे भूषण तळेराव, शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, उप तालुकाध्यक्ष, कृष्णा पाटील चित्रपट सेनेचे तालुकाध्यक्ष समाधान महाजन, महेंद्र मच्छिंद्र मरठे , तुषार तळेराव, हेमराज तळेराव , गोकुळ मित्र परिवार तसेच रूपेश मित्र परीवार व परिसरातील सर्व मनसे सैनिक यांचे अनमोल सहकार्य लाभले.