आदिवासी भागातील रस्त्यांसाठी धनंजय चौधरी रस्त्यावर.

आदिवासी भागातील रस्त्यांसाठी धनंजय चौधरी रस्त्यावर

दक्ष जळगाव प्रतिनिधी जुम्मा तडवी रावेर

रावेर तालुक्यातील आदीवासी भागातील प्रमुख रस्ते पाल – रावेर वाया कुसंबा व पाल- रावेर वाया आभोडा, या दोन्ही रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेत परिसरातील नागरिकांनी धनंजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित ‘रास्ता रोको’ आंदोलन थेट ११ः०० वाजेपासुन ४ः०० वाजेपर्यंत केले.
सदर रस्ते सन २०२२ महाविकास आघाडी च्या काळात आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांनी अर्थसंकल्प अधिवेशनात मंजुर करण्यात आले होते, त्यानंतर महायुती सरकार ने मंजुर कामे स्थगित केले व विरोधी पक्षाचे आमदार कोर्टात गेल्यानंतर त्या रस्त्याची स्थगिति हटवल्या नंतर जळगाव उत्तर विभागाने या कामांना कार्यारंभ आदेश दिला पण या रस्त्यांची दुर्दशा अशी की निवळ राजकीय दबावने बांधकाम विभाग व वन विभागाच्या जाणीवपूर्वक दुरलक्ष केल्याने या रसत्यांवर ६-७ अपघात व ३ गर्भवती महिलांचे रस्त्याने हॉस्पिटल ला जाता जाता प्रस्तुती झाली.हे वेदनादायी आहे त्या मायबाप जनतेसाठी आज रस्त्यावर उतरावे लागले

आंदोलनावेळी या वेळी प्रशासनाने आश्वाशीत केले की महसूल क्षेत्रात येणाऱ्या रस्त्यां विरोधात वन विभागाचा काही आक्षेप नसून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले व सुरू देखील केल  ⁠वन परीसरातील रस्त्याची ‘स्पॉट वेरिफ़िकेशन’ ला सोमवार दिनांक १/७/२४ रोजी चा मुहूर्त दिला व २ दिवसात NOC देऊ असे सांगितले.


या प्रसंगी डॉ राजेंद्र पाटील, राजु सवर्णे, महेंद्र पवार, योगेश पाटील, लियाकत जमादार, संजय पवार, युनुस तडवी, सलिम तडवी, नारायण काका घोडके, प्रदीप सपकाळे, मुबारक तडवी सर, मुकेश पाटील, विवेक महाजन सर, गुलशेर तडवी, भगवान काका महाजन, भुपेंद्र भाऊ जाधव, गणेशभाऊ महाजन, सउद शेख, संतोष पाटील, राहुल महाजन, हनिफ पेहलवान, चंद्रामनी तायडे, सॅम तडवी,बशीर काळू तडवी, जहाँबीर सबज तडवी, नाशिर महेबुबा तडवी, बशीर महेबूब तडवी, गुलशेर सुलतान तडवी, राजू बशीर तडवी, गफ्फार सुपडू तडवी, मुशीर बशीर तडवी, विनोद तायडे, चांदखान महेबूब तडवी, जुम्मा साहेबबुब तडवी, दिलदार शित्रू तडवी, महेबुब तुकडू तडवी, आमिन नसीर तडवी, रसूल हबीब तडवी, आमत बाबू तडवी,नमत बाबू तडवी, अरमान सिकंदर तडवी, प्रवीण कैलास तायडे, कैलास दयाराम तायडे, सुरेश दयाराम तायडे, सलीम सुलेमान तडवी, व आभोंडा, रसलपूर मुंजलवाडी, कुसुम्बा, पाल, मोरव्हाल, सहस्त्रलिंग, लालमाती, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *