विश्वकर्मा योजना प्रभावीपणे राबवा नशिराबादच्या शिष्टमंडळाचे जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्यांना निवेदन

नशिराबाद – केंद्र सरकारतर्फे पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. त्यात सरकारचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की, नागरिकांना रोजगार मिळेल, नशिराबाद येथील सुमारे २०० नागरिकांनी अर्ज भरले आहेत. त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. २०२० मध्ये नशिराबाद नगरपरिषद झाली असून संकेतस्थळावर अजुनही ग्रामपंचायत नशिराबाद दाखवत आहे. त्यामुळे नागरिकांना अर्ज कुठे जमा करायचा? हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी राजेंद्र चव्हाण यांना निवेदन देऊन प्रश्न मांडण्यात आला. त्यांनी या संदर्भात नशिराबाद येथील नगरपरिषदचे मुख्याधिकारी आर.आर. सोनवणे यांना सूचना देऊन फॉर्म जमा करा असे सूचवले आहे. या वेळी शिवसेनेचे प्रदीप साळी, अरुण भोई, चेतन चौधरी, विशाल झोपे, दीपक जावरे आदी निवेदन देताना उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *