शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने भडगावातील किरकोळ विक्रेत्यांना छत्रीचे वाटप.

शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या वतीने भडगावातील किरकोळ विक्रेत्यांना छत्रीचे वाटप.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली सुर्यवंशी यांनी शहरातील किरकोळ विक्रेत्यांना छत्रीचे वाटप केल्याने ते भारावल्याचे दिसून आले.
शिवसेना-उध्दव ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी या सातत्याने नाविन्यपूर्ण पध्दतीत जनहितार्थ उपक्रम राबवत असतात. आज पक्षाचे प्रमुख उध्दव  ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी असाच एक अनोखा उपक्रम राबविला. याच्या अंतर्गत भडगाव शहरातील फळे, भाजीपाला तसेच अन्य वस्तूंची किरकोळ विक्री करणार्‍या विक्रेत्यांना मोठ्या गोलाकार छत्रीचे वाटप केले. यामुळे कडाक्याचे उन असो की, जोरदार पाऊस, विक्रेत्यांना यापासून बचाव करण्याचे एक उत्तम साधन मिळाले आहे. वैशाली सुर्यवंशी यांनी प्रत्येक विक्रेत्याकडे जाऊन त्याला ही स्नेहाची भेट प्रदान केली तेव्हा सर्व जण भारावून गेल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमाला भडगाव शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवासेन, महिला व अन्य आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *