मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे शिक्षण सप्ताह संपन्न
मानव सेवा माध्यमिक विद्यालयात दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेसदर कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला
22 जुलै 2024 टीएलएम दिन म्हणजेच अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यात वाचन कट्टा क्लब स्थापन करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले 23 जुलै 2024 मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस म्हणजेच भाषा व गणितीय माहिती दिवस साजरा करण्यात आला सुरुवातीला निपूण प्रतिज्ञा घेण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणित तज्ञांची माहिती सांगितली तसेच एलसीडी प्रोजेक्टर वर विद्यार्थ्यांना रामानुजन या गणित तज्ञांची माहिती दाखविण्यात आली इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषेतील मुळाक्षरे व भौमितिक आकृत्यांवर आकर्षक रांगोळ्या काढल्या. 24 जुलै 2024 क्रीडा दिवस साजरा करण्यात आला सुरुवातीला क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांची बुद्धिबळ या खेळाची स्पर्धा घेण्यात आली व विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा शिक्षक गिरीश जाधव यांनी देशी मैदानी खेळ खेळल्याने होणारे फायदे व महत्व याविषयी मार्गदर्शन केले
25 जुलै 2024 सांस्कृतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला यात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या .कथाकथन, गीत गायन व पारंपारिक वेशभूषा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला 26 जुलै 2024 कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आला यात विद्यार्थ्यांनी कापडी व कागदी पिशव्या तयार केल्या प्रथमोपचार कार्यशाळ घेण्यात आली .तसेच एलसीडी प्रोजेक्टर वर विद्यार्थ्यांना मातीकाम बांबू काम याविषयी माहिती दाखविण्यात आली 27 व 28 जुलै 2024 मिशन लाइफ च्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रमध व शालेय पोषण दिवस म्हणून साजरा करण्यात आला प्रथम इको क्लब स्थापन करण्यात आला विद्यार्थी शिक्षक व माता पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच पालक ,विद्यार्थी व शिक्षक यांच्या समवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा पाणी जिरवा यावर नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांना एलसीडी प्रोजेक्टर वर जलसंवर्धनाविषयी माहिती दाखविण्यात आली शाळेत शिक्षण सप्ताह हा आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेतला कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. आरएस डाकलियाजी व पदाधिकारी यांच्या प्रेरणेने शिक्षण सप्ताह कार्यक्रम राबविण्यात आला प्रसंगी उपशिक्षिका अलका महाजन व रत्ना चोपडे अनिता शिरसाठ गिरीश जाधव उपस्थित होते कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले