जसप्रीत बुमराहने इतिहास रचला, गाबा कसोटीत पूर्ण केले खास अर्धशतक; कपिल देव यांनाही मागे टाकले

बुमराहने पहिल्या सामन्यापासूनच खळबळ उडवून दिली असून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गाबा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतही त्याची घातक गोलंदाजी सुरूच होती. यासह त्याने ऑस्ट्रेलियात विकेट्सचे झंझावाती ‘अर्धशतक’ पूर्ण केले. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात आपल्या गोलंदाजीने पेटला आहे. बुमराहने पहिल्या सामन्यापासूनच खळबळ उडवून दिली असून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गाबा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीतही त्याची घातक गोलंदाजी सुरूच होती. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ६ फलंदाजांना आपले बळी बनवले. यासह त्याने ऑस्ट्रेलियात विकेट्सचे झंझावाती ‘अर्धशतक’ पूर्ण केले. आता त्याच्या नावावर कांगारू संघाच्या भूमीवर केवळ १० कसोटी सामन्यांमध्ये ५० बळी आहेत. अशी कामगिरी करणारा तो कपिल देवनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

जसप्रीत बुमराहने गाबामध्ये ६ विकेट घेत कपिल देवलाही मागे टाकले आहे. तो ऑस्ट्रेलियात सर्वात जलद ५० बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव यांनी ११ कसोटी सामन्यात २४.५८च्या सरासरीने ५१ विकेट घेतल्या तर बुमराहने केवळ १० सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. सध्या या दोन भारतीय गोलंदाजांच ऑस्ट्रेलियात ५० विकेट घेण्याचा पराक्रम करता आला आहे. एवढेच नाही तर आशियाबाहेर सर्वाधिक ५ बळी घेण्याच्या बाबतीत बुमराहने कपिल देवलाही मागे टाकले आहे. बुमराहने आशियाबाहेर १२ वेळा ही कामगिरी केली आहे, तर कपिल देवने ११ वेळा ही कामगिरी केली होती. या दोघांनंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स अनिल कुंबळेच्या नावावर आहेत, ज्याने आपल्या कारकिर्दीत ४९ विकेट घेतल्या आहेत. तर आर अश्विनने ४० आणि बिशन सिंग बेदीने ३५ विकेट्स घेतल्या आहेत. यासह जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १४७ वर्षांचा विक्रम मोडला. गाबा येथे पहिल्या डावात ६ विकेट घेतल्यानंतर बुमराहने केवळ ८२ कसोटी डावात १९१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने केवळ १९१.८१ च्या सरासरीने इतक्या विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला इतक्या कमी सरासरीने १९० बळी घेता आलेले नाहीत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल बोलायचे झाले तर २०२३-२५ च्या चक्रात बुमराहने १३ सामन्यांच्या २४ डावांमध्ये केवळ १५.१५च्या सरासरीने ६३ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराह सध्याच्या WTC सायकलमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. या बाबतीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ६० विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आहे, ज्याने २६ डावांत ६० विकेट्स घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *