नाहीतर मुंबई वेगळी होईल, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे मोठे विधान

विधानसभा निवडणूक पार पडल्यावर आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. मुंबई पालिकेवर आम्हाला सत्ता मिळवायची नाहीतर मुंबई वेगळी होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  ज्यांनी आम्हाला मतदान केलं ते मिळालंच नाही असं लोकं सांगत आहे. याचं उदाहरण मारकडवाडीमध्ये पाहायला मिळालं. लोकांच्या संतप्त भावना आहेत. महाविकास आघाडी अद्याप असून आता स्वबळावर लढण्याच्या चर्चा सुरू आहेत. कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असते. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते. लोकसभेला की कमी इच्छुक असतात, विधानसभेला वाढतात आणि तेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीला संख्या अधिक वाढते.

काही जागा आम्हाला वाटत होतं की ज्या आम्हाला मिळायला पाहिजे त्या आम्हाला मिळाल्या नाहीत. खेळ आळंदीची जागा शेवटच्या क्षणी मिळाली आणि ती आम्ही जिंकलो. आमच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की आम्ही जुन्नरची जागा लढलो असतो तर जिंकलो असतो. जेव्हा आघाडीत असतो तेव्हा होत असतं. पण आता ज्याच्या हातात ईव्हीएम त्याची लोकशाही असं समीकरण झालं आहे. पण ठिक आहे त्यातून मार्ग निघेल, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभेला सत्ता येईल असा विश्वास तिन्ही पक्षांना होता. आता महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून काय चित्र आहे ते समोर आहे. सरकार स्थानप झालं तर मंत्रिमंडळ तयार होतं नव्हतं, मंत्रिमंडळ स्थापन झालं तर खातेवाटप होत नाहीये. पाशवी बहुमत यांच्याकडे आहे, कोण अडवत आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी खून, हत्या आणि बलात्कार होत आहेत. मुंबई महापालिका कळीचा मुद्दा असतो. शिवसेना हा पालिकेमध्ये महत्त्वाचा फॅक्टर असतो. आम्ही मुंबईमध्ये दहा जागा जिंकल्या, मुंबई महापालिकेवर आम्हाला काहीही करुन सत्ता मिळवावी लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल. कारण आपण पाहत आहात मराठी माणसावर हल्ले होत आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.दरम्यान, युतीमध्ये आम्ही अनेक जागा दिल्या होत्या. भाजपने जागावाटपामध्ये अनेक जागा खेचल्या आणि त्यांनी कायमस्वरूपी ताबा घेतला. आम्ही म्हणायचो हिंदुत्त्वावादी मत आहेत विभागली जाऊ नयेत त्या माध्यमातून आम्ही भरपूर जागा दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *