कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत जागतिक मधमाशी दिवस साजरा

कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत जागतिक मधमाशी दिवस साजरा

रावेर ता.प्रतिनिधी :प्रदीप महाराज –

२० मे २०२४ रोजी कृषी विज्ञान केंद्र, पाल, जळगांव यांच्या मार्फत जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी जळगांव जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी मधमाशी हाताळण्याचा प्रात्यक्षिक अनुभवले. तांत्रिक चर्चासत्रात डॉ.धीरज नेहेते यांनी रोपवाटिका निर्मिती करून रोजगाराची संधी तर प्रा.अतुल पाटील यांनी व्यवसायिक गांडूळ शेती बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रा.महेश महाजन (प्रमुख, केव्हीके) यांनी मधमाशी पालन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सद्याच्या आधुनिक शेती मध्ये रासायनिक कीडनाशके तसेच खते यामुळे पर्यावरणातील मधमाशी पोळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि याचा परिणाम पीक उत्पादन वाढीवर झालेला दिसून येत आहे.अधिक उत्पन्न घेण्यासाठी मधमाशी शेतामध्ये असणे आवश्यक असून भविष्यात देखील मधमाशी पोलांची संख्या वाढली पाहिजे याकरिता पाल येथील कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत मधमाशी पालन केंद्र सुरू करण्यात आले जेणे करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करता येईल व पीक उत्पादन वाढीसाठी मदत होईल.या कार्यक्रम प्रसंगी शिवार फेरी च्या माध्यमातून विविध उपक्रम बाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर श्री.अजय सपकाळ,श्री. धनजय शेरकर ,जितेंद्र गवळी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रवीण चव्हाण यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *