भारतीय जैन संघटना तर्फे मुक्या प्राण्यांसाठी मातीचे फुलपात्रे वितरीत

भारतीय जैन संघटना तर्फे मुक्या प्राण्यांसाठी मातीचे फुलपात्रे वितरीत

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी

भगवान महावीरांचा संदेश आहे की, “जिओ ओर जिने दो” आणि अहिंसाचे प्रेरक असल्यामुळे येथील भारतीय जैन संघटनाच्या वतीने मुक्या प्राण्यांसाठी अनेक घरा मध्ये मातीचे फुलपात्रे (कुंड्या) वितरित करण्यात आल्या मागेल त्याला हे फुलपात्रे देण्यात आले. हे फुलपात्रे घेण्यासाठी अनेकांनानी मागणी केली होती. हे फुलपात्रे साठी लागणारा सर्व खर्च भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष निर्मल सुगणचंद बोरा यांनी घेतला होता. प्रत्येक वर्षी फुलपात्रे, प्लास्टिक टफ, असे अनेक वस्तू जीवदया साठी वाटत असतो . मागील 8 ते 10 वर्षांपासून भारतीय जैन संघटना हा उपक्रम प्रत्येक उन्हाळ्यात राबवत असते.यामुळे शहरात भारतीय जैन संघटनेचे सर्वत्र कौतुक होत असते. मागील दोन वर्षांपासून मात्र प्लास्टिक टफ न वाटता मातीचे फुलपात्रे वाटण्यात येत आहे कारण प्लास्टिक टफ मध्ये प्राण्यांसाठी ठेवलेले पाणी गरम होऊन जायचे म्हणून मागील दोन वर्षा पासून माती फुलपात्रे वाटत असतो असे संघटनांच्या सदस्यांनी बोलताना सांगितले फुलपात्र वाटण्यासाठी दिनेश लोडया,प्रविण राखेचा, संघपती गुलाबचंद देसरडा,दीपक राखेचा, शांतीलाल कोचर,आनंद आचलिया, आकाश जैन ,श्रनिक रूनवाल, क्षितिज चोरडिया गौरव कोचर,मंयक बरडीया,दर्शन देशलहरा, अभय ब्रम्हेचा, निर्मल बोरा आदींनी मेहनत घेतली व अनेकांच्या घरात हे फुलपात्रे पोहचविण्याचे काम केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *