अष्टभुजा माता मंदिराच्या बाजूला भव्य रक्तदान शिबिर संपन्न

अष्टभुजा माता मंदिराच्या बाजूला जामनेर रोड ,भुसावळ तालुका, जिल्हा जळगाव

टायगर ग्रुपचे संस्थापक वस्ताद जालिंदर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ गावातील अष्टभुजा माता मंदिराच्या बाजूला भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी सुमारे 36 रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.टायगर ग्रुपचे संस्थापक जालिंदर जाधव यांच्या १७ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप भुसावळ तालुका शाखेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान डॉ तानाजीभाऊ जाधव , सागर कांबळे, कान्हादेश अध्यक्ष (खानदेश) पैलवान ऋषिकेश बाबा भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष मुकुल महाजन शहर उपाध्यक्ष जय भिरूड व समस्त भुसावळ तालुका टायगर ग्रुप सदस्य यांनी या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबिरात प्रामुख्याने तज्ञ डॉक्टरांनी आवश्यकतेनुसार योग्य मार्गदर्शन देण्यात आले. या शिबिरामध्ये डॉक्टर रवींद्र पाटील ,डॉक्टर सैयद अली ,दीपक पाटील,अमोल शेलार आदी तज्ञ डॉक्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हे शिबिर यशस्वीतेसाठी ग्रुपचे भुसावळ शहर अध्यक्ष मुकुल महाजन, उपाध्यक्ष जय भीरुड, प्रथमेश बोरोले , सुनील पाटील,आकाश जाधव,सागर कोळी,भुवणेश जावरे,सचिन सोनवणे ,विनोद सोनवणे ॲड किशोर खलसे आर्दीनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *