निमगव्हाण येथे शनिवारी तापीमाई जन्म सोहळा

निमगव्हाण येथे शनिवारी तापीमाई जन्म सोहळा


जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी

निमगव्हाण येथुन जवळच असलेल्या निमगव्हाण येथील श्री स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परंहंस श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठापनामार्फत १९४८सालापासुन सुर्य कन्या तापीमाई जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तापी माई जन्म सोहळा निमत्त ‘तापी माई पोथी वाचन जोशी महाराज कुरवेलकर हे करित आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की, सालाबादाप्रमाणे सुर्यकन्या तापीमाई कथा व पोथी वाचन, तसेच अखंडपणे नामस्मरण व हवन सप्ताहास. आषाढ शुद्ध प्रतिपदा दि. ६जुलै २४पासून सुरुवात झाली आहे. ती आषाढ शुद्ध सप्तमी दि. १३ जुलै २४ रोजी पर्यंत चालणार आहे. पोथी समाप्ती व तापीमाई. जन्म शनीवारी दि. १३ जुलै रोजी आहे. तापी माई जन्मसोहळा आहे. सकाळी पुजन. हवन’ दादाजी धुनिवाले मंदिरापासून महिलांची डोक्यावर कलश धरून सवाद्य मिरवणूकीने तापी माय की, जय धून हो ! माय जय धुण हो ! या घोषणांच्या जलोषात तापी नदिवर वाजत गाजत नाचत जाऊन तापी मातेला हिरवा साडीचा आहेर पुजा अर्चा करून अर्पण करण्यांत येतो नंतर दुपारी १२ वाजता महाआरती होऊन तापी माईला पुरणपोळीचा नैवद्य देण्यांत येतो. ‘त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचे वाटप सुरु असते महिला बालगोपाळ मंडळी व ग्रामस्थ भाविक भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेऊन आपले मनोरथ करीत असतात. स्वामी भक्तानंद गुरू रेवानंद परमहंस कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पतिष्ठानाद्वारे करण्यात आले आहे. या कार्यकमास चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक कावेरी मॅडम ह्या त्यांचा पोलिस पथकामार्फत चोख बंदोबस्त ठेवून आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *