समशेरपुर येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय येथे वृक्षदिंडी.

समशेरपुर येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण


नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथे आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत समशेरपुर गावातून वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा याप्रमाणे घोषणा देण्यात आल्या वृक्षदिंडीच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये पर्यावरण विषयी जनजागृती निर्माण केली त्यावेळी गावातील भगिनी यांनी वृक्षदिंडी चे पूजन केले


वृक्षदिंडी चे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केले होते शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून पर्यावरण वाचवण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले त्यात कडुलिंब, गुलमोहर, पिंपळ, अशोक ,वड इत्यादी झाडे शाळेच्या परिसरात लावण्यात आली या वृक्षांच्या संवर्धनासाठी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना दोन झाडांची जबाबदारी देण्यात आली. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पियुष पाटील सौ एम सी कासार , ए बी पाटील, आर जी जाधव, एस के पाटील, पी एन पाटील व्ही पाटील, श्रीमती ए सी ढोले, एस आर कासार, पी व्ही बोरसे, पि यु पाटील, आर एस जाधव, ए एम भिल, आर के मराठे इत्यादींनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *