पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपाचं वर्चस्व, शिवसेना- राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना वगळले.

भाजपकडे वीस मंत्री असून शिंदे गटाकडे तेरा व अजित पवार यांचे नऊ मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील चार कॅबिनेटसह दोन राज्यमंत्र्यांकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद आलेले नाही. पालकमंत्री पद न मिळालेले मंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मंत्री नाही. याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले, दादा भुसे या कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश आहे. गेले अनेक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या पालकमंत्री पदाची यादी शनिवारी सायंकाळी उशिरा जाहीर झाली आहे मात्र यामध्ये भाजपाचा वरचष्मा असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री पदाची नावे व जिल्हे जाहीर करतानाच यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून शह देण्यात आल्याच दिसत आहे. यामध्ये कोणत्याही जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी न देता यामध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांना व राज्यमंत्र्यांना मात्र वगळण्यात आल आहे. कोकणातही रत्नागिरीचा अपवाद वगळता सिंधुदुर्ग भाजपकडे तर रायगड मध्ये भरत गोगावले यांना डच्चू देत रायगडची जबाबदारी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहे त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत रायगड मधूनच नाराजी उफाळून आली आहे.भाजपकडे वीस मंत्री असून शिंदे गटाकडे तेरा व अजित पवार यांचे नऊ मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील चार कॅबिनेटसह दोन राज्यमंत्र्यांकडे कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद आलेले नाही. पालकमंत्री पद न मिळालेले मंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मंत्री नाही.

याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले, दादा भुसे या कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडेदेखील कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भाजपने त्यांच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्री व सह पालकमंत्री अशी जबाबदारी दिली आहे. आता शिंदे गटात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पुन्हा एकदा सुंदोपसुंदी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री पद यादी जाहीर होतात एकदा शिंदे यांच्या कोकणातील रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार मंत्री भरत गोगावले यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. रामदास कदम यांची सुपुत्र योगेश कदम यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी देतानाच त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण खाती देण्यात आली आहेत मात्र पालकमंत्री पदाची यादीतून त्यांना वगळण्यात आला आहे. यामुळे शिवसेना व अजितदादा राष्ट्रवादी गटात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *