महाकुंभाचा प्रवासयोग महागला! हवाईभाड्यात मोठी वाढ, जाणून घ्या नागपूर ते प्रयागराज विमानाचे तिकीट दर.

नागपूर ते प्रयागराज मार्गावरील कुठल्याही रेल्वेगाडीत आरक्षण मिळणे अशक्य झाले आहे. ऑनलाइन बुकिंग करायला गेल्यास ‘रिग्रेट नो मोअर बुकिंग’ असा संदेश दिसतो.सध्या सर्वत्र प्रयागराज सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची चर्चा आहे. अनेकांना या महाकुंभात सहभागी व्हायचे आहे. दररोज मनोमन नियोजन सुरू आहे. एक मन जायलाच हवे म्हणून हुंकार भरत आहे तर दुसरे मन, ‘इतकी गर्दी, प्रदूषण नको रे बाबा…’ म्हणत दूर पळत आहे. अशी द्विधा मन:स्थिती असतानाच विमानांच्या तिकिटांमध्ये झालेली अतिप्रचंड वाढ आणि नागपूर येथून पुरेशा रेल्वेगाड्याची कमतरता यामुळे सामान्य भाविकांसाठी महाकुंभचा ‘योग’ साधणे अवघड असल्याचे चित्र आहे.मात्र, प्रयागराजच्या विमान तिकिटांचे तब्बल दर ३०० ते ४०० टक्क्यांनी वाढले आहेत. नागपूर ते प्रयागराज विमानाचे भाडे सामान्यपणे ८००० ते ९००० रूपये असते. मात्र, महाकुंभच्या कालावधीत मागणी वाढल्यामुळे या विमानांचे भाडे २५,००० ते ३९,००० पर्यंत पोहोचले आहे. येत्या गुरुवारी, २३ जानेवारी रोजी नागपूर येथून प्रयागराजला जाणाऱ्या थेट विमानाचे तिकिट शनिवारी ३६ हजार रुपयांपेक्षा अधिक होते.

फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हे दर कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नागपूर ते प्रयागराज मार्गावरील कुठल्याही रेल्वेगाडीत आरक्षण मिळणे अशक्य झाले आहे. ऑनलाइन बुकिंग करायला गेल्यास ‘रिग्रेट नो मोअर बुकिंग’ असा संदेश दिसतो.महाकुंभादरम्यान येणाऱ्या दर्श अमावस्या (२९ जानेवारी), माघ पौर्णिमा (१२ फेब्रुवारी) आणि महाशिवरात्री (२६ फेब्रुवारी) या तीन महत्त्वाच्या दिवसांसाठी विमानाचे भाडे २९,००० ते ४०,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.नागपूरहून प्रयागराजला जाणाऱ्या खासगी बसेसच्या भाड्यातदेखील मोठी वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे भाड्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इतर दिवशी १००० ते १२०० रुपये असलेले तिकिट सध्या २००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक घेतले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *