थोरगव्हाण येथे डी .एस . देशमुख विद्यालयात धोंडू सखाराम देशमुख यांची जयंती कृतज्ञ भावनेने संपन्न .

थोरगव्हाण येथे डी .एस . देशमुख विद्यालयात धोंडू सखाराम देशमुख यांची जयंती कृतज्ञ भावनेने संपन्न . थोरगव्हाण तालुका रावेर येथिल दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण (स्थापना 1917 ) संचालित डी एस देशमुख हायस्कुल थोरगव्हाण येथे दि 10/12/2024 मंगळवार रोजी दानशूर व अभ्यासू व्यक्तिमत्व कै धोंडू सखाराम देशमुख, तालुका यावल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
विद्यालयात थोर समाज सुधारक संस्थापक कै तापीराम भगवान चौधरी,दानशूर व्यक्तिमत्व कै लक्ष्मण मुकुंदा पाटील , धोंडू सखाराम देशमुख व कै आसाराम तिमा चौधरी आणि कै गंगाधर पांडुरंग देशमुख यांच्या प्रतिमा ठेवून दीप प्रज्वलन केले व सर्वांच्या प्रतिमांना मनोभावे पुष्पहार अर्पण करून त्यांच्या गौरव कार्याचा उपस्थितांना परिचय करून देण्यात आला .


प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत जनार्दन चौधरी यांनी अध्यक्षस्थान भूषविले .
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर संचालक शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे , संचालक नंदकुमार चौधरी , संचालक चंद्रकांत पाटील , संचालक रविंद्र चौधरी . शाळेला नाव असलेले कै धोंडू सखाराम देशमुख यांचे वंशज पणतू माजी अध्यक्ष तथा संस्थेचे आजीव संचालक चंद्रकांत गंगाधर देशमुख व सौ. सुनंदाताई चंद्रकांत देशमुख सपत्नीक उपस्थित होते . चंद्रकांत देशमुख यांनी संस्थेची स्थापना झाल्या पासूनची पार्श्वभूमी इतिहास सांगितला . संस्थेला दहा हजार रुपयाची देणगीची घोषणा केली . एम के पाटील यांनी चंद्रकांत देशमुख यांनी दिलेली लिखित माहिती संदेश प्रकट वाचन केला . संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात चारही दानशूर दात्यांचा व समाज सुधारकांच्या सामाजिक शेक्षणिक कार्याबाबत ऋण व्यक्त केले . दिलेल्या देणगीचा विद्यार्थी हितासाठी विनियोग केला जाईल याची ग्वाही दिली . चंद्रकांत देशमुख  सुनंदातताई चंद्रकांत देशमुख यांनी संस्थेसाठी दहा हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली . वाय जे कुरकुरे यांनी सूत्र संचालन केले व सौ जे पी चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले . सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *