आजचे राशिभविष्य

मेष : आव्हान स्‍वीकारले तर यशस्‍वी व्‍हाल
आज अद्भुत ऊर्जा आणि उत्साह अनुभवाल. तुम्हाला मिळणार्‍या संधीचा तुम्‍ही पुरेपूर फायदा घेऊ शकाल, असे श्रीगणेश सांगतात. आव्हान स्‍वीकारले तर यशस्‍वी व्‍हाल;पण एखादी लहानशी प्रतिक्रिया देखील खूप नुकसान करू शकते. ग्लॅमर आणि सौंदर्य उत्पादनांशी संबंधित व्यवसायात प्रगती होईल. घशाचा संसर्ग होऊ शकतो.

वृषभ : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दिवस अनुकूल
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. संबंध चांगले ठेवण्यासाठी तुमचे विशेष योगदान असेल. तरुणाई नवीन उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतील. मुलांकडे दुर्लक्ष करु नका. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी तुमची आहे. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे हिताचे ठरेल, अशी सूचना श्रीगणेश करतात. घरातील बहुतांश कामे पूर्ण होतील. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

मिथुन : आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा
श्रीगणेश म्‍हणतात की, आज घरी पाहुण्‍याचे आगमन होईल. यामुळे तुम्हाला तुमच्‍या दैनंदिन वेळापत्रकात बदल करावे लागतील. दिवस तुमच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार जाईल. कोणाचीही निंदा करू नका. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळू शकतात. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्यावी.

कर्क : आत्मविश्वासाच्‍या जोरावर यश मिळवाल
आज आत्मविश्वास आणि मनोबलाच्‍या जोरावर यश मिळवाल. प्रभावशाली व्‍यक्‍ती बरोबर झालेली भेटीमुळे उत्‍पन्‍नाचे नवे मार्ग सापडतील. मनोरंजनावर खर्च करताना विचार करा. आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवा. व्यापारात नवीन करार मिळू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आहार घेताना काळजी घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

सिंह : आज तुम्‍हाला आर्थिक लाभू होवू शकतो
श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍हाला आर्थिक लाभू होवू शकतो. तुमच्या जवळच्या व्यक्तीला मदत कराल. इतरांच्‍या टीकेमध्ये भागीदार होऊ नका; त्यामुळे तुमचे नाते आणखी बिघडू शकते. मित्रांशी मतभेद होतील. भागीदारीशी संबंधित व्यवसायावर तुमची नजर असेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. व्यायाम आणि योगासनांवर भर द्या.

कन्या : तुमच्या वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
श्रीगणेश म्‍हणतात की, आज महत्त्वाची माहिती मिळवण्यात वेळ जाईल. अनुभवी व्‍यक्‍तीच्‍या सल्‍ल्‍याने प्रश्‍नावर तोडगा काढाल. तुमच्या वैयक्तिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला भावनिक आधाराचीही गरज असेल. व्यवसायातील व्‍यस्‍ततेने कुटुंबासाठी वेळ काढू शकाल. घर आणि कुटुंबात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. गॅस आणि बद्धकोष्ठतेमुळे पोट खराब होऊ शकते.

तूळ : व्यवसायात नवीन योजना सुरू करण्याची योग्य वेळ
आज तुम्ही तुमच्या स्वभावात केलेल्‍या सकारात्‍मक बदलामुळे कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये तुमची छाप कायम राहील, असे श्रीगणेश सांगतात. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची चिंता राहील. व्यवसायात नवीन योजनासुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जास्त शिळे आणि तळलेले अन्न खाणे टाळा.

वृश्चिक : वाहन काळजीपूर्वक चालवा
आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. विचारांमध्ये नकारात्मकता येऊ देऊ नका. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, अशी सूचना श्रीगणेश करतात. आज तुम्हाला व्यवसायात काही आश्चर्यकारक यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. वाहन काळजीपूर्वक चालवा.

धनु : महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी

आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबासाठी आनंदाने खर्च कराल. नातेसंबंध मजबूत होतील. रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा तुमच्या झोपेवरही परिणाम होईल. काही व्यावसायिक सहली पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक जीवन सामान्य रहिल. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर : जोडीदाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर

आज विशेष व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते. तुमच्या बोलण्यातून सर्व अडथळ्यांवर मात कराल. रखडलेली सरकारी कामे पूर्ण करताना अधिक मेहनत करावी लागेल. मुलांसोबत तणाव राहील. व्यवसायात नवीन संपर्क लाभदायक ठरू शकतात. कोणत्याही समस्येवर तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बदलत्या वातावरणामुळे ॲलर्जीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

कुंभ : तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा
आज तुम्‍ही तुमच्‍या कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे हाताळू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. तुमचा सन्मान वाढू शकतो. भावंडांसोबतचे नाते थोडे बिघडू शकते. तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनातील तणाव वाढू शकतो.

मीन : कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल
आत्‍मविश्‍वास वाढविण्‍यासाठी चांगले साहित्य आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये रस घ्या. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक बदल होऊ शकतात. घरात बोलण्याने भांडणाची स्थिती निर्माण होऊ शकते. तुमचा हट्टी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. स्वभावात थोडी लवचिकता ठेवा. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत काही ताण येऊ शकतो. व्यायाम करताना गाफील राहू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *