भवरलाल जैन वाचनालय धरणगाव तर्फे साळवे इंग्रजी विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप..

भवरलाल जैन वाचनालय धरणगाव तर्फे साळवे इंग्रजी विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप..


धरणगाव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात वहयांचे, लेखनाचे महत्त्वाचे स्थान असते- चेअरमन डॉ गिरीश नारखेडे. वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील


साळवे इंग्रजी विद्यालय ता. धरणगाव येथे मा.भवरलाल जैन सार्वजनिक वाचनालयाचे सचिव योगेश पी पाटील यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वहयांचे वाटप केले. त्यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती त्यांचे लेखन,  वह्या-पेन,  शैक्षणिक साहित्य,  विद्यार्थ्यांचा गणवेश यावर गुणवत्ता अवलंबून असते. असे प्रतिपादन केले. यावेळी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, साळव्याचे माजी सरपंच संजय नारखेडे,शिवसेना तालुका संघटक हेमंत चौधरी, साळवे उपसरपंच सुपुत्र इम्रान पटेल, ग्रामपंचायत सदस्य भूषण ब-हाटे,  मुख्याध्यापक एस डी मोरे, एस व्ही राठोड व डिंगबर पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही के मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन बी आर बोरोले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *