थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात गीता जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात गीता जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न. गीता जयंती निमित्त 11 डिसेंबर हा दिवस गीताई व मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा समितीतर्फे गीता जयंती दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली. हे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव व पर्यवेक्षक डी. के. पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. गीता जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या व स्पर्धेचे नियम मुख्याध्यापक सत्यगारायण वैष्णव यांनी सांगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय. जे. कुरकुरे यांनी केले. गीताई व मनाचे श्लोक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून एस. बी. सपकाळे, जयश्री चौधरी, एन. ए. देशमुख, आणि एम. के. पाटील यांची निवड करण्यात आली. या परीक्षकांनी स्पर्धकांचे परीक्षण केले.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी म्हणून श्लोक पाठांतरासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली : 30 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग .

 स्पर्धेचा निकाल: 5वी ते 7वी गटात गीताई अध्याय 10 ओवी क्रमांक 01 ते 15 स्पर्धेत समर महेंद्र वाघ (इयत्ता 7वी ब) याने मुलांच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक कुमारी एकता योगेश कुंभार 7 ब प्राप्त झाला
8वी ते 10वी गटात मनाचे श्लोक क्रमांक 8ा ते 95 स्पर्धेत कुमारी ममता बाळू पाटील (इयत्ता 10वी ब) हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचे मानकरी कुमारी गायत्री अरुण चौधरी 9 ब , कुमारी धनश्री आनंदा चौधरी 8 ब या विद्यार्थीनी ठरल्या . प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास
दानशूर दात्यांनी स्पर्धेसाठी ठेवलेल्या ठेवीवरील व्याज विजेत्यांना बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक डी. के. पाटील यांनी गीता पाठांतर व मनाचे श्लोक यांच्या महत्त्वाबाबत आपले विचार व्यक्त केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एन. ए. देशमुख, के. एम. पाटील आणि वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. जे. कुरकुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन के. एम. पाटील यांनी मानले. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *