निधन वार्ता. स्व. काशिनाथ त्र्यंबक सपकाळे. वृद्धापकाळाने दुःखद निधन.

निधन वार्ता….. स्व. काशिनाथ त्र्यंबक सपकाळे. ( रेल्वे सेवानिवृत ) वय 85 वर्ष मुळ राहणार चूनवाडे तालुका रावेर .


यांचे दि 13 जुलै 2024 शनिवार रात्री 10.00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले . अंत्यविधी 14 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता राहते घरून चुनवाडे स्मशानभूमी येथे होणार आहे . त्यांचे पश्चात दोन मुले, दोन मूली, जावाई, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.डी . एस . देशमुख माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण योथिल सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर काशिनाथ सपकाळे( एस. के. सपकाळे सर ) प्रगतीशील शेतकरी निवृत्ती काशिनाथ सपकाळे यांचे वडील होत . भुसावळ रेल्वे विभागात नोकरी करत असताना त्यांनी सहकारी यांचे समवेत नात्याची घट्ट वीण निर्माण केली. कायम चूनवाडे गावशी आपली नाळ जुळवून ठेवली निसर्ग स्नेही जीवनशैली आत्मसात केली. गरजवंताला निस्वार्थ सहकार्य मदतीची भावना, श्रमावर निष्ठा ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. काशिनाथ सपकाळे काका यांचे व्यक्तिमत्त्व होते.


दी एज्यूकेशन सोसायटी थोरव्हाण ता . रावेर माजी अध्यक्ष रावेर तालुका माजी आमदार आर . आर . पाटील, विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व संचालक बंधु -भगिनी मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव पर्यवेक्षक डी के पाटील सर्व शिक्षक बंधु भागिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांचे तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करीत आहोत . त्यांचे आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना . सपकाळे परिवाराच्या दुःखात सर्व स्टाफ् सहभागी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *