सुप्रिया सुळेंची पार्थ यांना मायेने मिठी, एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे ‘CM सहाय्यता निधी’

शरद पवारांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या या दिल्लीतील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. केक कापल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तिथेच उपस्थित असलेल्या खासदार निलेश लंके यांना त्याच तलवारीने केक भरवला. या व्हिडिओची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे.  शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ आणि जय पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी निवडणूक काळात शरद पवारांवर अत्यंत वाईट शब्दात टीका केली, ते शुभेच्छा देण्यासाठी आले असतील, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

 वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित आहेत. मात्र, यावेळी एक गोष्ट समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे या सर्वांना घ्यायला बाहेर उभ्या होत्या. त्यांनी सुत्रेना पवार यांना मिठी मारली, त्यानंतर आपला भाचा पार्थ पवार यांना देखील त्यांनी मायेने मिठी मारली. पक्ष दुरावले, विश्वासाला तडे गेले पण मनं नाही दुरावली… ते या भेटीवरुन दिसून येत आहे राष्ट्रवादीचे SP पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज ८४ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या औचित्याने शरद पवारांची अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी भेट घेतली आहे. दिल्ली येथील ६ जनपथ बंगल्यावर जाऊन सर्व नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळही यावेळी उपस्थित होते. त्यासोबत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवारही यावेळी तिथे सोबत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवार यांनी ट्विट करतही पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. वाढदिवसादिवशी अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज १२ डिसेंबर २०२४ रोजी आपला ८४वा वाढदिवस साजरा करत आहेत. तसेच ते आज ८५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि केंद्रातही कृषीसह विविध खात्यांचा पदभार सांभाळण्याचा अनुभव असलेले शरद पवार ८४व्या वर्षीही तरुणांप्रमाणेच काम करत आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना म्हणजेच शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आणखी एक झटका बसला आहे. शिंदेंचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुखपद काढून घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिवटेंऐवजी आता डॉ. रामेश्वर नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदाची धुरा सोपवली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींकडून नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. त्यानंतर मंगेश चिवटे यांनी फेसबुकवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर अनेकांनी चिवटेंना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.  राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून सर्वाधिक अर्थात १३२ आमदारांची संख्या असलेल्या भाजपला मंत्रिमंडळातील निम्मी अर्थात २२ मंत्रिपदे मिळणार असल्याचे खात्रीलायक समजते. गेल्या अडीच वर्षांत १०५ आमदार असतानाही भाजपला केवळ नऊ मंत्रिपदे मिळाली होती, मात्र आता ही सर्व कसर भरून निघणार असून पक्षातील अनेकांना मंत्रिपदे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदे मिळणार असल्याचेही समजते. मागच्या महायुती सरकारच्या काळात या तिन्ही पक्षाच्या वाट्याला समान मंत्रिपदे देण्यात आली होती कुर्ला बेस्ट बस अपघातास नेमकं कोण कारणीभूत, याचा तपास सुरु आहे. आतापर्यंत अपघाताच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांचे फूटेज समोर आल्याने घटनेवेळी बसचा वेग किती होता, याचा अंदाज येतो. मात्र बसच्या आतील सीसीटीव्हीचे फूटेज आता समोर आले आहे. यामध्ये अपघातानंतर चालक संजय मोरेही स्पष्टपणे दिसत आहे.सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने विदर्भाचा ६ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि शिवम दुबे या फलंदाजांनी क्वार्टरमध्ये मुंबई संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. या विजयासह मुंबईने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रमही केला. या फॉरमॅटमधील बाद फेरीत सर्वात मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम मुंबईने केला आहे. टी-२० मध्ये २२० किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य गाठणारा मुंबई आता पहिला संघ बनला आहे.  नव्या वर्षात राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसगाड्यातून प्रवास करताना सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार येणार आहे. एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये १४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. महामंडळाच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीनंतर याची अमंलबजावणी नव्या वर्षात अर्थात जानेवारी २०२५ पासून होण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *