पुणे महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याचा भाजप नेत्यांचा नारा! पुण्यात बदलणार महायुतीचे समीकरण

 महायुती पक्षात महापालिकेच्या निवडणुका या स्वबळावर घेण्यात याव्या अशी इच्छा थेट भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर वरिष्ठ नेते ठरवतील तो अंतिम निर्णय असेल असं शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणले, शिवसेना शिंदे पक्षाची महायुती मधूनच निवडणूक लढवण्याची इच्छा शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी व्यक्त केली आहे. तर अजित पवार घेतील तो अंतिम निर्णय असं राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर म्हणले आहेत. महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश प्राप्त झालं. तीच लाट महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळेल असा विश्वास महायुतीतल्या नेत्यांना आहे. परंतु तीन पक्ष एकत्र असल्यामुळे जागा वाटपात तीढा निर्माण होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. महायुती पक्षात महापालिकेच्या निवडणुका या स्वबळावर घेण्यात याव्या अशी इच्छा थेट भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तर वरिष्ठ नेते ठरवतील तो अंतिम निर्णय असेल असं शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणले, शिवसेना शिंदे पक्षाची महायुती मधूनच निवडणूक लढवण्याची इच्छा शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी व्यक्त केली आहे. तर अजित पवार घेतील तो अंतिम निर्णय असं राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर म्हणले आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर २०१७ पर्यंत अजित पवार यांच वर्चस्व होतं. परंतु २0१७ नंतर अजित पवारांच्या वर्चस्वला धक्का बसला आणि अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लागला. भाजपचे सर्वधिक नगरसेवक निवडणून आले. परंतु आता तीन पक्ष एकत्र असल्याने पुण्यात महापालिकेवर वर्चस्व कोणाचं असणार हा पेच निर्माण झाला आहे. एकेकाळी विरोधात लढलेली जागा आता एकत्र असल्यामुळे कोणाला संधी मिळणार याची अंतर्गत कुजबूज सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी तिन्ही पक्षांमध्ये कमी जागा घेतल्या होत्या मात्र आता महापालिकेत अशीच परिस्थिती राहिल का ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेचा प्रभाग (वॉर्ड) तीन नगरसेवकांचा की चार, हाही वाद आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तसा ठरावच विधानसभेत केला होता व त्याच पद्धतीने निवडणूक घेतल्यामुळे बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आली. त्यावेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवार यांनी चार नगरसेवकांच्या प्रभागाला विरोध केला होता. भाजपला वगळून झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांच्या आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिला ठराव पालिका निवडणुकीसाठीचा चार नगरसेवकांचा प्रभाग बदलून तो तीनचा केला होता. त्यानंतर अडीच वर्षांनी महायुती होऊन भाजप सत्तेत आले आणि पुन्हा चारचा प्रभाग करण्यात आला.

नव्या महायुती सरकारमध्ये भाजपच प्रमुख घटक असल्याने आता एका प्रभागात चार नगरसेवक याप्रमाणेच निवडणूक होईल हे नक्की आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणले, पुणे महापालिका स्वबळावर लढवावी अशी सर्व कार्यकर्त्यांची ईच्छा आहे. आमचे सर्वधिक नगरसेवक असल्यामुळे जगा कोणाला जाऊ नये म्हणून पक्षाने याचा विचार करावा. परंतु महायुती सरकार एकत्र असल्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जो निर्णय घेतील तो आम्हला मान्य असेल. आम्ही लोकसभा आणि विधानसभेला महायुतीचं काम केलं आहे. पुणे शहरात आमचा एकही उमेदवार नव्हता परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी मेहनत घेतली. म्हणून येणाऱ्या निवडणुका या महायुती सोबत एकत्र लढवाव्या अशी मागणी आमच्या वरिष्ठांकडे आहे। अजित पवार जे तोरण बांधील ते धोरण. त्यामुळे शेवटची इच्छा आणि पहिली इच्छा ही फक्त अजित पवारांची असते, जो निर्णय ते देतील तो आम्हाला मान्य करावाच लागेल. त्यामुळे फक्त अजित पवार यांची जी इच्छा आहे त्या भूमिकेवरती आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *