भारतीय संघात स्थान न मिळूनही इशान किशन थांबला नाही, सुरु केली नवी इनिंग; सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केली.

 टीम इंडियाने इशान किशनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० संघात निवड न झाल्यानंतर इशानला एकदिवसीय मालिकेसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळाले नाही. यादरम्याम, इशानने आता एक गुडन्यूज दिली आहे.टीम इंडियाने इशान किशनकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० संघात निवड न झाल्यानंतर इशानला एकदिवसीय मालिकेसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळाले नाही. ईशान नोव्हेंबर २०२३ पासून टीम इंडियापासून दूर आहे. सध्या इशान देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसत आहे. देशांसाठी खेळणाऱ्या संघात इशानचे नाव जवळपासही दिसत नाही. यादरम्यान, इशानने आता एक गुडन्यूज दिली आहे.डाव्या हाताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने ही क्रिकेट अकादमी स्वतःच्या नावाने सुरू केली आहे. ‘द इशान किशन अकादमी’ असे त्यांच्या अकादमीचे नाव आहे. इशान किशनने या अकादमीची पायाभरणी त्याच्या गावी म्हणजेच पाटणामध्ये केली आहे. अकादमीची माहिती देताना तो म्हणाला की, “ही एक नवीन सुरुवात आहे. या उपक्रमाबद्दल तो खूप उत्सुक आहे की तो त्याच्या गावी सुरू करणार आहे.” अकादमी सुरू करण्यामागील इशान किशनचा उद्देश त्याच्या गावातील तरुणांमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि या खेळाबद्दलची त्यांची समज विकसित करणे हा आहे. जेणेकरून आगामी काळात बिहारमधून अधिकाधिक खेळाडू बाहेर येऊ शकतील.

इशान किशनने भारतासाठी आतापर्यंत २ कसोटी, २७ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७८, ९३३ आणि ७९६ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इशानची आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी २१० वांची आहे.नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळताना इशान किशनने ७ सामन्यात ३१६ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी ४५.१४ होती, तर स्ट्राइक रेट १२८ च्या आसपास होता. इशान किशनची सर्वोत्कृष्ट खेळी मणिपूर विरुद्ध विजय हजारे येथे झाली, जिथे त्याने ७८ चेंडूत १३४ धावा केल्या. IPL २०२५ साठी इशान किशनने सनरायझर्स हैदराबादसोबत करार केला आहे. याआधी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *