भडगाव शहरात युवासेना संवाद बैठक संपन्न

भडगाव शहरात युवासेना संवाद बैठक संपन्न

भडगाव तालुका प्रतिनिधी : यशकुमार पाटील


भडगाव : पाचोरा भडगाव मतदारसंघात युवासेना (शिंदे गट) विस्तार कार्यक्रम सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार भडगाव शहरातील पेठ भागात प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर युवासैनिकांची संवाद बैठक उत्साहात संपन्न झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन ,उपजिल्हाप्रमुख दुर्गेश वाघ, तालुकाप्रमुख रविंद्र पाटील यांनी मार्गदर्शन करून सर्व युवासैनिकांना प्रोत्साहित केले. युवकांमध्ये असलेल्या समस्या जाणून घेतल्या व आमदारांकडे मांडून लवकरच समस्यांचे निवारण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


सदर बैठकीला शिवसेना शहरप्रमुख अजय(आबा) चौधरी, योगेश गंजे, युवासेना उपजिल्हासंघटक निलेश पाटील, शिवसैनिक गणेश नरवाडे, युवासेना शहरप्रमुख चंद्रकांत(बंटी) वाघ, निशांत सोमवंशी, शहर सरचिटणीस सुदर्शन कोळी तालुका संघटक स्वदेश पाटील, विद्यार्थीसेना प्रमुख तेजस पाटील, उपशहरप्रमुख चेतन पाटील, मयुर महाजन, यासह भडगाव पेठ भागातील सर्व नवतरुण, युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया कोणतीही प्रेस नोट, बातमी, पत्रकार परिषद निमंत्रण किंवा निमंत्रण पत्रिका थेट साप्ताहिक दक्ष जळगाव वृत्तपत्र & CI NEWS च्या क्रमांकावर पाठवावे
जळगाव येथून प्रसारीत होणारे साप्ताहिक दक्ष जळगाव वृत्तपत्र & C I News YouTube News Channel , वेब न्यूज, Facebook News Channel
मुख्य संपादक राजेंद्र एस. निकम , जळगाव
M0b. 9422777566/9422777237

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *