वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवा भावी संस्था कडून पर्यावरण दिन साजरा

वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवा भावी संस्था कडून पर्यावरण दिन साजरा


जळगांव वार्ताहर: दिनांक ११ जुन २०२४ रोजी वर्ल्ड व्हिजन इंडिया कडून पर्यावरण दिन संपूर्ण धरणगाव तालुक्यात साजरा आला . मागील सप्ताहा भर हा पर्यावरण दिन ५ जुन ते ११ जून २०२४ रोजी साजरा करण्यात आला या संपूर्ण सप्ताहा मध्ये एकूण २३ गावात जनजागृती करण्यात आली . या पर्यावरण सप्ताहा मध्ये मुलांनी चित्रकला स्पर्धा ,पर्यावरण दिन , मनोगत , निबन्ध स्पर्धा , रॅली व झाडे लावून तालुक्यात जनजागृती करण्यात आली . पर्यावरण किती महत्वाचा आहे व आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ,

हे या पर्यावरण सप्ताहा मध्ये एकूण २३ गावात हा संदेश देण्यात आला . तसेच २३ गावातील ५० बाल गट मुलांनी या पर्यावरण दिन साजरा करण्यास सहभाग घेतला जांभोरे या ठिकाणी दिनांक ११ जून २०२४ रोजी सांगता करण्यात आला . या वेळी वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवा भावी संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी मुलांना मार्ग दर्शन केले, प्रत्येक कुटूबाने एक तरी झाडे लावले पाहिजे व पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे असे मार्ग दर्शन केले . जांभोरे गावाचे ग्रामस्थ व ग्राम पंचायत सदस्य उपस्तित होते . तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया चे कर्मचारी रतिलाल वळवी , विजेश पवार, निखिल कुमार सिंग , स्वयंम सेवक आरती पाटील , जांभोरे गावातील ग्रा. प . सदस्य नाना आहिरे , आनंद पवार महाराज जांभोरे ,अंगणवाडी सेविका शिला पवार , सुगंधाबाई पवार आदी मान्यवर उपस्तित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *