देवरे विद्यालयात, सिद्धेश्वर विद्यालयात, वंदे मातरम् शैक्षणिक संकुल येथील 15 जून अर्थात शाळेचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा

देवरे विद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मुळ गावी स्वागत, सन्मान

विखरण- .आप्पासाो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयातील नाशिंदे व खापरखेडा येथील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मिनी ट्रॅक्टर मध्ये बसवून विद्यार्थ्यांच्या मूळ गावी वाजत गाजत रॅली काढण्यात आली.प्रथमतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी केले.नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण,स्वागत रथाचे उद्घाटन नाशिंदे ग्रा.पं.सरपंच मिनाबाई अरुण पाटील व विलास साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व इ.5 वी प्रवेशीत विद्यार्थीचे मिनीट्रॅक्टर ट्रॉली वर बसवून गावात मिरवणूक काढण्यात आली.तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते खापरखेडा येथील ग्रा.पं.सदस्य, पोलीस पाटील दुला दगडू ठाकरे, नाशिंदा येथील जेष्ठ नागरिक युवराज दिपचंद पाटील ,खंडु कौतीक पाटील, ज्ञानेश्वर कोळी, रमेश चतुर पाटील यांच्या हस्ते नवप्रवेश विद्यार्थ्यांना पुस्तक,वही,पेन गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे उपशिक्षक के.पी.देवरे, डी.बी.भारती, एम.डी. नेरकर,वाय.डी.बागुल,एम.एस.
मराठे, डी.बी.पाटील,एम.आर. भामरे,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.

2 सिद्धेश्वर विद्यालयात नवगतांचे स्वागत नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित सिद्धेश्वर विद्यालय समशेरपुर येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात गावातून प्रभात फेरी काढून करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून गावातील पालक सौ विमलताई भिल, गोविंद दगडू चौधरी, श्री सुनील काशिनाथ चौधरी, गणेश रोहिदास कोळी व शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले


मुलांना शाळेचे आकर्षण वाटावे यासाठी शाळेत विशिष्ट पद्धतीने सजावट करण्यात आली होती शाळेचे मुख्याध्यापक पियुष पाटील यांनी पालकांसोबत पहिला दिवसाच्या व येत्या शैक्षणिक वर्षात नियोजन व कामाचा आढावा सांगितला नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक व गुलाबाचे फुल पालकांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे देखील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात व विद्यार्थ्यांना पोषण आहारा सोबत मिष्टांन देखील देण्यात आले आला त्यावेळी शाळेच्या उपशिक्षिका सौ एम सी कासार ए बी पाटील,सौ आर जी जाधव ,सौ एच पी रघुवंशी, पी एन पाटील, जे व्ही पाटील, एस आर कासार,  पी यु पाटील , आर एस जाधव, ए एम भिल ,आर के मराठे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे क्रीडाशिक्षक ए बी पाटील यांनी केले

3 नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु येथील वंदे मातरम् शैक्षणिक संकुल येथे 15 जून अर्थात शाळेचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला…शाळेच्या पहिला दिवस असलेल्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी वेशभुषा केलेल्या कार्टून ने सर्वांचे लक्ष वेधले… नंतर शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी आपल्या लहान बंधू सोबत नृत्य करत खूप आनंद साजरी केला … त्या नंतर सर्व नवीन तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्या सोबत गावात वाजत गाजत गावातून शोभायात्रा काढण्यात आली.. गावात सर्वत्र पालकाची गर्दी शोभा यात्रा पाहण्यात मग्न झाली होती… यात पालकांसह विद्यार्थांचा आनंद त्यांचा चेहऱ्यावर दिसत होता.. गावातून विविध भागातून शोभायात्रा शाळेत पोहचली नंतर सर्व विद्यार्थ्यांसह पालक बंधू भगिनींनी भोजनाचा आस्वाद घेतला…त्या नन्तर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तु व पुस्तके वाटण्यात आली…कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदे मातरम् शैक्षणिक संकुलचे चेरमन तथा अध्यक्ष श्री.नितीन पाटील सर व मुख्याध्यापिका सौ अर्चना पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले … व सर्व शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी यांनी परिश्रम करून संपूर्ण कार्यक्रम पार पाडला….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *