स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत आमदाराला झोप लागल्यामुळे या गावाला रस्त्यापासून राहावे लागले वंचित,

स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत दुसखेडा गावातील आदिवासी नागरिक रस्त्यापासून राहावे लागले वंचित

 

धरणगाव- झुरखेडा ते दुसखेडा रस्ता व्हावा अशी गावातील शेतकऱ्यांची व दुसखेडा येथील आदिवासी समाजाची मागणी होती ती पूर्ण करण्यासाठी झुरखेडा गावचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या सर्व शेतकऱ्यांच्या सहकाऱ्याने ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या बांधावरून जागा दिले त्यांचेकडून संमतीपत्र बनवून तहसीलदार यांचेकडून रीतसर आदेश बनवुन सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली त्यानंतर झुरखेडा गावातील लोकनियुक्त सरपंच यांनी गुलाबरावजी पाटील जळगाव जिल्हा पालकमंत्री यांच्याकडे रस्ता मजबुती करण करून डांबरीकरण करण्याची मागणी केली आणि पालकमंत्री महोदय यांनी क्षणाचा ही विलंब न लावता किशोर पाटील दोनगावकर कॉन्ट्रॅक्टर यांना सांगून आमची मागणी तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि त्यांनी देखील तो रस्ता खळी व मुरूम टाकून मजबुती करणाचे काम पूर्ण करून दिले त्याबद्दल गुलाबरावजी पाटील यांचे समस्त झुरखेडा व दुसखेडा गावातील सर्व शेतकरी व नागरिकांनी आभार व्यक्त केले

दुसखेडा गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

गेल्या अनेक वर्षांपासून दुसखेडा येथील आदीवासी मुलांना रस्ता नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते पण ह्या नागरिकांच्या समस्येकडे आतापर्यंत कोणीही लक्ष देत नव्हते पण ह्या वस्तुस्थितीचे गांभीर्याने लक्ष देत गावातील आताचे लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील यांनी गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने सर्व पाठपुराव्याने पूर्ण करून घेतले आता गावातील मुलांना शाळेत जाता येईल दुसखेडा गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे तेथील नागरिकांना दवाखान्यात देखील जाता येत नव्हते, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत कोणीही पोहवू शकत नव्हते, मुलं वयात आल्यावर देखील तेथील मुलांचे लग्न जुळत नव्हते कारण मुलींवाले तेथील मुलांना रस्ता नसल्यामुळे मुलगी देत नव्हते, त्या परिसरात गावातील शेतकऱ्यांची साधारपणे चारशे ते पाचशे बिघे  शेतीजमीन आहे पण त्यांना देखील त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नव्हता कारण झिरी नदीत पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधण्यात आल्यामुळे शेतीची कामे करण्यासाठी जाता येत नव्हते, आता मात्र लोकनियुक्त सरपंच व पालकमंत्री महोदय यांच्या सहकाऱ्यांने हा रस्ता तयार झाला असून यांचा दोन्ही गावातील शेतकऱ्यांना  व नागरिकांना खूप फायदा होणार आहे लोकनियुक्त सरपंच यांनी गावातील शेतकऱ्यांनी तसेच दुसखेडा येथील नागरिकांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *