चहार्डी येथे बसचा अपघात

चहार्डी येथे बसचा अपघात


जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी

चोपडा तालुक्यातील साखर कारखाना गेट जवळ नारायण आधार पाटील यांचा शेताजवल मागुन येणाऱ्या वाहनांना ओवरटेक करण्याचा नादात चोपडा ते नवेधुपे बस क्रमांक एम एच 14 बी टी 2083 ही बस चहार्डी ते वेले रस्त्यावर हा अपघात झाला सदर अपघातात मिनाबई संदीप पाटील रा विचखेडा गणेश रोहीदास कोळी, हिरकनबाई रोहीदास कोळी दोघे राहणार नवेधुपे हे तीन प्रवाशी जखमी झाले आहेत तसेच बस चालक संदीप फुलपगारे यांना हाताला दुखापत झाली आहे वाहक सुनीता कंखरे यांना पोटाला मार लागला आहे जखमी प्रवाशांवर उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पुढील उपचार सुरू आहे इतर किरकोळ जखमी प्रवाशांवर चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी उपचार केला अपघाताची बातमी गावात कळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *