हतनूर प्रकल्प पुनर्वसन अंतर्गत पाच गावातील गृह संपादन.

हतनूर प्रकल्प पुनर्वसन अंतर्गत पाच गावातील गृह संपादन ,भूसंपादन,तसेच नागरी सुविधांचा 301.02 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाच्या मदत व पुनर्वसन विभाग व महसूल तसेच वनविभागाकडे पाठविला आहे.

रावेर प्रतिनिधी : विनोद कोळी

हतनूर प्रकल्प पुनर्वसन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघाडी, भामलवाडी, ऐनपुर , नेहते,तसेच मुक्ताईनगर येथील काही घरे हतनूर प्रकल्पाच्या जलाशयाच्या पाण्यामुळे बाधित होतात .या घरांचे संपादन व पुनर्वसन करण्यासाठी नियामक मंडळाची मान्यता मिळाली आहे.त्यानुसार मुक्ताईनगर येथील 413 घरे,110 कोटी रुपये. नेहते 182 घरे, 24.93 कोटी. वाघाडी 463 घरे, 100.93 कोटी.ऐनपुर 250 घरे, 392, कोटी.तर भामलवाडी 199 घरांसाठी 26.49 कोटी रुपये असा 301.2 कोटी रुपयांचा खर्चास शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता व आवश्यक निधी मिळण्यासाठी चा प्रस्ताव राज्य शासनाकडे जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांनी पाठविला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *