कमळगाव येथे पाणी पुरी खाल्ल्याने शेकडो जणांना विषबाधा

तालुक्यातील पिंप्री-चांदसणी – कमळगाव येथे पाणी पुरी खाल्ल्याने शेकडो जणांना विषबाधा

चार गावांमध्ये भीतीचे वातावरण : गटविकास अधिकाऱ्यांसह आरोग्य पथक ठाण मांडून

प्रतिनिधी समाधान कोळी

तालुक्यातील पिंप्री-चांदसणी – कमळगाव या तीन गावात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे शंभरच्या वर ग्रामस्थांना डायरिया सारखा त्रास झाला. परिस्थितीचे गांभीर्य पाहता आमदार लता सोनवणे यांनी आरोग्य विभागाला सतर्क केले. परिणामी गटविकास अधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात ठाण मांडून बसले आहे. तर अत्यवस्थ २३ रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांचेवर वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील, डॉ. चंद्रहास पाटील, डॉ.अजय जोगदंड, डॉ. प्रसाद पाटील व त्यांच्या आरोग्य पथकाने शर्थीचे प्रयत्न करून अत्यवस्थ परिस्थितून बाहेर काढले. यावेळी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील किरण देवराज, तसेच मंगल इंगळे, नंदू गवळी, दिव्यांक सावंत हे रुग्णांच्या मदतीसाठी धावून आलेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *