दिव्यांग बांधवांन साठी शारीरिक व मानसिक समुउपदशन आरोग्य शिबीर

दिव्यांग बांधवांन साठी शारीरिक व मानसिक समुउपदशन आरोग्य शिबीर

आज दिनाक: २१/०६/२०२४ रोजी धरणगाव कृषी बाजार समिती येथे वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव व जिल्हा मानसिक आरोग्य विभाग जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांची व मानसिक रूग्ण यांच्या साठी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जिल्ह्याचे डॉक्टर ज्योति पाटील,डॉक्टर दौलत राव पाटील, व संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटल जळगांव, वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे, दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भाऊ पाटील, कृषि बाजार समितीचे उप सभापती संजय पवार, नवनाथ वायडे साहेब आदी मान्यवरांनी मार्ग दर्शन केले.


वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव संस्थेचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी प्रस्ताना केली दिव्यांग देखील आपलेच अंग आहे, आपण त्यांना कसे सक्षम करू शकतो असे उदाहरण देऊन मार्ग दर्शन केले व जिल्ह्याचे सिव्हिल हॉस्पिटल चे डॉक्टर ज्योति पाटील,डॉक्टर दौलत राव पाटील यांनी मोनोरुग्न व दिव्याग वेक्ती चे कशी काळजी घेतली पाहिजे व मानसिक आरोग्य ची काळजी, स्वतःला कसे सक्षम केले पाहिजे व विविध ॲक्टिव्हिटी देऊन सुंदर मार्ग दर्शन केले.


या शिबिरात धरणगाव तालुक्यातील ३० गावातील ११२ लाभार्थी उपस्थित होते. वर्ल्ड व्हिजन इंडियाचे कर्मचारी रतीलाल वळवी व अंकिता मेश्राम यांनी सुत्र संचालन केले . वर्ल्ड व्हिजन इंडियाचे विजेश पवार, निखील कुमार सिंग, स्वयम सेवक जितेंद्र राजपूत, आरती पाटील, रचना जाधव, वैष्णवी पाटील व जळगांव जिल्हl चे सिव्हिल हॉस्पिटल चे राखी मॅडम, जळगांव चे एन.जी.ओ. चे कानिफनाथ सर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *