सट्टा पत्ते व अवेद्य पद्धतीने सुरू असलेली वाळू विक्री त्वरित बंद करण्यात यावी, मनसेची मागणी

पाचोरा येथे पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव कृष्ण दुंदुले यास केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ व तालुक्यात सुरू असलेल्या सट्टा पत्ते व अवेद्य पद्धतीने सुरू असलेली वाळू विक्री त्वरित बंद करण्यात यावी या आशियेचे निवेदन भडगाव येथे तालुकाध्यक्ष सागर पाटील शहर अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली एरंडोल येथे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बागुल व तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांच्या नेतृत्वाखाली तसेच चाळीसगाव येथे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील शहर अध्यक्ष डॉ. खरसाने तसेच पारोळा जिल्हा उपाध्यक्ष प्रज्वल चव्हाण शहर अध्यक्ष छोटू लोहार यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक तसेच तहसीलदार यांना निवेदने देण्यात आले असून लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करून अवेद्य धंदे तात्काळ बंद करावे,

अन्यथा दिनांक 27 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *