चोपडा तालुक्यात हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

चोपडा तालुक्यात हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दर वर्षी जुन महिन्यात “हिवताप प्रतिरोध महिना” म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने चोपडा शहर तथा ग्रामीण भागातील जनतेमध्ये “हिवताप” तथा इतर “किटकजन्य आजारा” विषयी जनतेमध्ये जनजागृती होण्याच्या मुख्य उद्देशाने.. जिल्हा आरोग्य अधिकारी-डॉ.सचिन भायेकर, जिल्ह्या हिवताप अधिकारी-डॉ.तुषार देशमुख यांच्या आदेशानव्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, इतर शासकीय रुग्णालयामधून.. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत हिवताप प्रतिरोध मोहीम हि यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

तथा चोपडा तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली, सर्व आरोग्य केंद्रांमध्ये.. आरोग्य कर्मचऱ्यांकडुन, विविध उपक्रमांचे आयोजन करून, हिवतापाचे लक्षणे, त्यांवरील उपाययोजना, हिवताप प्रतिरोधाचे विविध ठिकाणी जाऊन हस्तपत्रिकेद्वारा जनजागृती करुन, सदरची हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.

कमळगाव-चांदसनी गावांतील.. गर्दी असलेल्या चौका-चौकाच्या ठिकाणी जाऊन अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना हिवताप आणि किटकजन्य आजारासंबधी खालीलप्रमाणे… आरोग्यपुर्ण असे मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम हिवताप प्रतिरोध महिना केव्हा आणि कसा व का साजरा केला जातो, याबद्दल विस्तृत माहिती दिली. दर वर्षी जून हाच महिना का निवडला गेला– केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानुसार जनतेमध्‍ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्‍यासाठी दरवर्षी जून मध्‍ये हिवताप प्रतिरोध महिना… जिल्हा आरोग्य अधिकारी, तथा जिल्‍हा हिवताप अधिकारीमार्फत विविध उपक्रमाव्‍दारे गांव पातळीपर्यंत राबविण्‍यात येतो.

विविध उपक्रम पुढील प्रमाणे– पदयात्रा, ग्रामसभा, प्रभातफे-या, कार्यशाळा, प्रशिक्षण, विविध माध्यमाव्दारे प्रसिध्दीद्वारे (वृत्तरपत्रे, हस्तधपत्रिका, भित्तींपत्रिका, भिंतीवरच्या म्हणी, आकाशवाणी, दूरदर्शन, केबल टी.व्हीव. इत्या्दी. च्या माध्यमातून जनतेपर्यंत जनजागृती करण्याचा या मागील मूळ उद्देश असतो. हिवताप आजार आणि इतर कीटकशास्त्रीय आजारामध्ये प्रामुख्याने सर्वेक्षण करणे आवश्यक असते.

अ) सर्वेक्षण नवीन हिवताप आजाराचे रुग्‍ण शोधण्‍यासाठी राज्‍यातील सर्व पाडा, वाडया, वस्‍ती,गावपातळीवर कर्मचा-यांमार्फत सर्वेक्षण करून घेणे. त्यात प्रामुख्याने आरोग्‍य कर्मचा-यांमार्फत किटकशास्त्रीय सर्वेक्षण करून घेणे. ” आशा ” स्‍वयंसेवक / पाडा स्‍वयंसेवकाचा स्‍थानिक स्‍तरावर किटकजन्‍य रोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग असतो.

ब) डास नियंत्रणासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करण्यात येत असतात.

१) किटकनाशक फवारणी – राज्‍यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्‍त गावांमध्‍ये सिंथेटीक प्रायरेथ्राईड गटातील किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्‍यात येते.

२) अळीनाशक फवारणी – नागरी हिवताप योजने अंतर्गत राज्‍यातील निवडक १५ शहरांमध्‍ये (मुंबईसह) डासोत्‍पत्‍ती स्‍थानांवर टेमिफॉस, बी.टी.आय. या अळीनाशकाची फवारणी करण्‍यात येते. राज्‍यात नागरी हिवताप योजनेत समाविष्‍ट असलेली १५ शहरे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे व मुंबई.

३) जीवशास्त्रीय उपाययोजना – किटकनाशकामुळे होणा-या प्रदूषणाचा विचार करुन राज्‍यामध्‍ये योग्‍य डासोत्‍पत्‍ती स्‍थानांमध्‍ये डास अळीभक्षक गप्‍पीमासे सोडण्‍यात येतात. सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही राबविण्यात येत असतात.

किटकनाशक भारित मच्‍छरदाण्‍यांचा वापर करून संरक्षण करणे– गेल्या वर्ष २००५ पासून ते आतापर्यंत ५२७१ संवेदनशील निवडक गावांमध्‍ये १०.८७ लाख मच्‍छरदाण्‍यांचे वाटप करण्‍यात आले आहे. त्‍यापैकी ५ लाख मच्छशरदाण्या सुस्थितीत आहेत.

हि आणि इतर उपयुक्त माहिती विजय देशमुख यांनी जनतेपर्यंत देण्याचा छान प्रयत्न केला.

प्रसंगी…. अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, क्षयरोग प्रयोगशाळा तालुका पर्यवेक्षक-किशोर सैंदाणे, तालुका हिवताप पर्यवेक्षक- परेश जोशी, चांदसनी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी- डॉ.माधुरी महाजन, आशा सेविका- संगीता धनगर, शोभा नाव्ही, अर्धवेळ परिचारिका-रत्नाबाई साळुंखे गावातील ग्रामस्थ व प्रतिष्ठित व्यक्ती देखील उपस्थित होते,
सदर कार्यक्रमाकरिता- वैद्यकीय अधिकारी डॉ अर्चना पाटील,डॉ-कोमल गवांडे, तालुका हिवताप पर्येंवेक्षक- परेश जोशी, तालुका हिवताप सहाय्यक-जगदीश बाविस्कर, लॅब टेक्निशियन-कोमल गोसावी, आरोग्य सहाय्यक- यशवंत आर.पाटील यांचे विशेष योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *