डॉ. हिना गावित यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट; रघुवंशी यांनी दिल्या आशीर्वादपर शुभेच्छा

डॉ. हिना गावित यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट; रघुवंशी यांनी दिल्या आशीर्वादपर शुभेच्छा

नंदूरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे

नंदुरबार – महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. नंदुरबारच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही घटना शहरवासीयांना धक्का देणारी ठरली आणि त्यामुळेच रघुवंशी व गावित यांची भेट शहरवासीयांच्या चर्चेची सुद्धा बनली.

अधिक वृत्त असे की, श्री गणेशाच्या चरणी नारळ वाढवून नंदुरबार शहरात प्रचाराला शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी आज दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी माननीय एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेना कार्यालयात जाऊन शिवसेनेचे संपर्क नेते तथा माजी आमदार माननीय श्री चंद्रकांत जी रघुवंशी यांची भेट घेतली तसेच आशीर्वादही घेतले. माननीय चंद्रकांत जी रघुवंशी यांनी याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर हिनाताई गावित यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री राम रघुवंशी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपाचे युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे, आनंदा माळी, माजी गटनेते चारुदत्त कळवणकर, शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, रवींद्र पवार आदी उपस्थित होते. एकनाथराव शिंदे गटाची शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असतानाही लोकसभा निवडणूक प्रचारात सहभागी झालेला दिसत नव्हता त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर हिनाताई गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची घेतलेली ही भेट चर्चेचा मोठा विषय बनली. दरम्यान डॉक्टर हिनाताई गावित यांनी शहीद स्मारक सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबून अभिवादन केले. ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी आणि तत्सम मान्यवरांच्या घरी भेट दिली. माजी नगराध्यक्षा इंदू काकू चौधरी, माजी नगरसेविका सौ अनिता चौधरी यांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *